
उदय कुलकर्णी- editor@esakal.com
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यावर सामान्य माणूस कोलमडून पडतो. त्या वेळी त्याला आधार, दिलासा व धैर्य देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभं राहण्यास प्रवृत्त करणं हे मोठं आव्हान असतं. हे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांनी १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी दाखवलं होतं. पवार यांच्या सामर्थ्याने भारावून जाऊन प्रा. डॉ. शशिकांत चौधरी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजेच ‘धरणीमाय’!