
दिलीप कुंभोजकर kumbhojkar.dilip@gmail.com
स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम करून मला ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता जशी भावली तशी मांडीत आहे. प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्या गोष्टी ऐकत, वाचत आम्ही मोठे झालो. लहानपणापासून सावरकर यांची समुद्रातील उडी, काळ्या पाण्याची शिक्षा, १८५७चे स्वातंत्र्यसमर हे शब्द कानी पडायचे. शालेय पुस्तकातून ही कविता डोकवायची तर रेडिओवरून लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या आवाजातून कानावर पडायची! शाळेच्या स्नेहसंमेलनाची सुरुवातच ‘जयोस्तुते श्री महन्मंगले...’ या गीताने होत असे. थोडक्यात सावरकर नावाचा संस्कार लहानपणीच झाला.