

Italy football team 2026 World Cup playoff qualification
sakal
जयेंद्र लोंढे
इटली क्रिकेट संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वकरंडकात सहभागी झाला आहे. याप्रसंगी इटली िक्रकेट संघातील खेळाडू वेन मॅडसन याने इटलीच्या फुटबॉल संघासाठी पुढाकार घेतला आहे. चार वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या इटलीच्या फुटबॉल संघाला मागील दोन विश्वकरंडकात पात्र ठरता आलेले नाही. २०२६ मधील विश्वकरंडकासाठीही या संघाला अद्याप पात्रता मिळवता आलेली नाही. इटली क्रिकेट संघाचा विश्वकरंडकातील समावेश व खेळ पाहून इटलीच्या फुटबॉल संघाला प्रेरणा मिळावी, असे वेन मॅडसन याला वाटते.