
Magical Story
sakal
गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
परीराज्यापासून काहीसं दूर, एका छोट्याश्या गावात राहत होता निक. तो बिचारा अगदी गरीब होता. दगडी बांधकाम असलेल्या मोठ्या घरात तो एकटाच राहायचा. त्याच्या घराला लागून होता एक प्रशस्त व्हरांडा आणि त्या पुढे पसरलेली फुलांची बाग. स्वतःच्या मळ्यातून येणारं भरपूर दूध, लोणी, चीज, अंडी, गव्हाचं भरघोस पीक, फळे, परसबागेत लावलेला भाजीपाला वगैरे गोष्टी होत्या आणि या सगळ्याची देखभाल करता येऊ शकेल अशी ठणठणीत तब्येतही त्याची होती.