प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात पहिले शाही स्नान होऊन गेले आहे, आता प्रतीक्षा आहे पुढच्या चार स्नानांची. महाकुंभ मेळ्यात स्नानानंतर मोक्ष मिळतो, असा समज भाविकांमध्ये असल्याने कुंभमेळ्यातील स्नानास महत्त्व असते. मकर संक्रांतीच्या दिवशी अर्थात १४ जानेवारीला दीड कोटी भाविकांनी इथल्या संगमावर स्नान केले.