
Marathi Literature
sakal
saptrang@esakal.com
मालतीबाई बेडेकर यांचे ‘विवाहानंतर’ हे पुस्तक प्रकाशित करून १९५२ मध्ये प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवलेली मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था मराठी साहित्यविश्वात एक नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते. या प्रकाशन संस्थेचे संचालक अशोक कोठावळे यांनी नुकताच पंचाहत्तरीत प्रवेश केला. त्यानिमित्ताने मराठी प्रकाशनविश्वाचे व वाङ्मयीन व्यवहाराचे अंतरंग उलगडणारी त्यांची मुलाखत घेतलीय माजी साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी...पुस्तक विक्रेते ते पुस्तक प्रकाशक हा मॅजेस्टिकचा प्रवास कसा झाला? ते आम्हाला समजून घ्यायला आवडेल.