data
sakal
एकेकाळी तेलाभोवती फिरणारी जगाची अर्थव्यवस्था आता डेटाभोवती फिरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, अशीच सध्याची परिस्थिती आहे. सहज उपलब्ध झालेले इंटरनेट, प्रत्येक व्यक्तीच्या हातापर्यंत पोहोचलेले तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्थेला असलेल्या पोषक वातावरणामुळे डेटा हा सर्वांच्याच परवलीचा शब्द झाला आहे. अगदी वैयक्तिक पातळीपासून ते विविध शासकीय-खासगी कार्यालये, कॉर्पोरेट्स, उद्योगधंदे, व्यापार, शिक्षण, अशा जवळपास सर्वच क्षेत्रात डेटा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.