भारताच्या वायव्येपासून ईशान्येपर्यंत तब्बल अडीच हजार किलोमीटरहून अधिक लांबवर पसरलेली पर्वतरांग म्हणजे हिमालय. अजस्र, महाकाय, बलाढ्य अशी अनेक विशेषणं ज्याला लावता येतील, असा हा हिमालय. कधी विचार केला आहे? हा हिमालय नसता तर काय झालं असतं? मला तर असं वाटतं आपलं अस्तित्व आहे, कारण हिमालय आहे.