

Allegorical Political Stories
esakal
एका गावात एक मांजर, एक माकड आणि एक उंदीर राहात होते. तिघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. खरे तर तिघेही व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र आलेले होते. त्यातील मांजर ही राज्याच्या मंत्रिमंडळात महिला विकास आणि शिक्षणमंत्री होती. मांजरीला कुठेही गेले तरी सारखे काहीतरी खाण्याचा छंद होता. ती इतके खाते तरीही तिच्याकडे दोन खाती का दिलेली आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. पण सरकारला प्रश्न विचारणार कोण?
माकड हा किराणा, भुसार मालाचा मोठा व्यापारी होता. कितीतरी सरकारी खात्यांमध्ये, मंत्रिमंडळामध्ये त्याच्या खास ओळखी होत्या. उंदीर एका सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ झाला होता. पण या पंचतारांकित नोकरीव्यतिरिक्त तो सरकारी खात्यासाठी केटरिंगदेखील करत असे. उंदराला लहानपणापासून सारखे काहीतरी चावून चोथा करण्याची सवय लागली होती. तो सारखे काहीही दातांशी धरत असे. त्यामुळे त्याचे नाव ‘दंतरु’ असे पडलेले होते.