
विक्रांत खानविलकर
कोकणात सर्व ऋतूंचे सोहळे साजरे करत जाणारा एक रस्ता होता ‘एन. एच. १७’... म्हणजेच जुना मुंबई-गोवा महामार्ग. आता नवीन ‘एन. एच. ६६’ महामार्ग रडत-कुथत तयार होतोय. जुन्या महामार्गाने गर्द वनराई, नदी-नाले, धबधबे, शेत-शिवार बघत कोकणातल्या उत्तम खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत प्रवास करायचं स्वप्नं लवकर प्रत्यक्षात यावं, असं इथल्या प्रत्येक माणसाला आता वाटतंय.