
डॉ. धनराज खानोरकर-khanorkardhanraj17@gmail.com
झाडीपट्टी अनेक विशेषांनी समृद्ध आहे. हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या जसा समृद्ध आहे, तसा सांस्कृतिकदृष्ट्याही भरीव आहे. झाडीपट्टयात झाड हा मुख्य घटक आहे. किंबहुना त्यावरुनच ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ असे या प्रदेशाला म्हटले जाते. झाडांनी वेढलेला भाग आणि हिरवेकंच रान ही झाडीची शान आहे. काही पट्टयांत एकाच प्रजातीची झाडे असल्यामुळे लोकवस्त्यांना या झाडांवरुनच गावांची नावे पडल्याचे दिसते. उंबरी (उंबर), मोहगाव (मोह), बोरगाव (बोरी), चिचगाव (चिंच), वडगाव (वड), निमगाव (निम), जामडी (जांभूळ), आवळगाव (आवळा), परसटोला, पळसगाव (पळस), सावरगाव (सावरी), आमगाव (आंबा), खैरलांजी (खैर), कवटारा (कवट) इत्यादी ग्रामनामे वृक्षाधिष्ठित असून एकाच नावांची अनेक गावेही झाडीपट्टीत आढळून येतात.