briton power
sakal
- श्रीराम कुंटे, editor@esakal.com
एके काळी एक सामान्य देश असणाऱ्या ब्रिटनने अर्ध्या जगावर राज्य केलं. भटकं जीवन जगणाऱ्या मंगोल लोकांनी कोरियापासून हंगेरीपर्यंत जगातल्या सगळ्यात मोठ्या सलग भूप्रदेशात आपलं साम्राज्य उभं केलं. जगाच्या इतिहासात साम्राज्यांची आश्चर्यकारक अशी अनेक उदाहरणं आहेत. ही साम्राज्यं उभी राहिली कारण ती महत्त्वाकांक्षी किंवा लष्करीदृष्ट्या वरचढ होती इतकं सरळ याचं उत्तर नाहीये. या साम्राज्यांकडे एकाच वेळी अनुकूल भूगोल, अचूक वेळ, तंत्रज्ञान आणि साधनसामग्री यांसारख्या गोष्टी होत्या. आता आपण या गोष्टींबद्दल सविस्तरपणे बघू या.