

Insightful review of The Roses—a sharp British adaptation exploring ego, decay and emotional destruction.
Sakal
अक्षय शेलार (shelar.abs@gmail.com)
ऑन स्क्रीन
जे रोच दिग्दर्शित ‘द रोझेस’ हा सिनेमा वॉरेन ॲडलरच्या ‘द वॉर ऑफ द रोझेस’ या कादंबरीवर आधारलेला आहे. ही कादंबरी ऐंशीच्या दशकातील अमेरिकन मध्यमवर्गीय आकांक्षा, उपभोगवाद आणि स्वार्थाच्या छुप्या हिंसेवर केलेली सूक्ष्म, उपरोधिक टिप्पणी होती. अॅडलरची लेखनशैली गुळगुळीत विनोदी नव्हती, तर ती शांत, निरीक्षणक्षम होती. कादंबरीतील रोझ दाम्पत्य एकमेकांना ‘नष्ट’ करण्याची, वेडसरपणाची छटा असलेली इच्छा बाळगून असलं, तरी तिचा गाभा घरगुती भांडणाबद्दल नसून अहंकाराबद्दल आहे. दोन सुशिक्षित माणसं एकमेकांवर का तुटून पडतात? प्रेम कुठे नि कसं बदलतं? घर केवळ निवासस्थान न राहता रणांगण कधी बनतं? या प्रश्नांवर अॅडलर फार शांत; पण तिरसट पद्धतीने भाष्य करतो.