Maharashtra folk culture book : ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’; महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक वारशाचा अद्वैती संदर्भग्रंथ

Marathi Folk Music : महाराष्ट्राच्या प्राचीन 'शिव-शक्ती' लोक-गान परंपरेचा सखोल वेध डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ग्रंथातून घेण्यात आला आहे. कलगीतुरा, भेदिक लावण्या आणि विविध लोककलांमधील आध्यात्मिक रहस्यांचे उलगडा करणारा हा ग्रंथ सांस्कृतिक वारशाचा अनमोल दस्तऐवज आहे.
Maharashtra folk culture book

Maharashtra folk culture book

esakal

Updated on

प्रा. सत्यजित खांडगे - saptarang@esakal.com

महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक परंपरांच्या प्राचीन आणि समृद्ध वारशाचे प्रतिबिंब म्हणजे मराठी लोक-गान परंपरा होय. लावणी, पोवाडा, भारूड, गोंधळ, कोळीगीते, भलरी गीते, जात्यावरच्या ओव्या अशा लोकगीतांतून मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचे दर्शन घडते. या लोकपरंपरा मौखिक स्वरूपात जोपासल्या गेल्या आणि पिढी दर पिढी हस्तांतरित होत गेल्या. शिवशक्ती संप्रदायातील या लोक-गान परंपरेचे बृहत् विवेचन लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी संपादित केलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेल्या ‘शिव-शक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ या ग्रंथात केले आहे. डॉ. खांडगे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व संदर्भासह या परंपरेचा मागोवा घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com