Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

Archaeological excavations in Maharashtra : मुंबईजवळील नालासोपारा हे एकेकाळी 'शूर्पारक' नावाने ओळखले जाणारे पश्चिम भारतातील सर्वात समृद्ध बंदर आणि बौद्ध केंद्र होते. सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तूप असलेला हा ऐतिहासिक वारसा आजही संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.
Sopara Buddhist Stupa

Sopara Buddhist Stupa

esakal

Updated on

राकेश मोरे - rakesh.more@esakal.com

मुंबई महानगराची व्याप्ती इतकी मोठी आहे, की वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली, वाढली आणि फुलली. आज जसं मुंबई सर्वात महत्त्वाचं व्यापारी बंदर मानलं जातं, तसंच तिचंच उपनगर असलेलं नालासोपारा हे एकेकाळी सुप्रसिद्ध ‘सोपारा’ नावाचं समृद्ध बंदर होतं आणि पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक. भगवान बुद्धाचे पदस्पर्श लाभलेले हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण असावे.

मुंबईच्या गजबजाटापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर, गोंगाटापासून थोडं दूर गेलं की एक शांत, इतिहासाने समृद्ध ठिकाण आपल्याला साद घालतं ते ठिकाण म्हणजे नालासोपारा. आजूबाजूला हिरवळ, नारळाची उंच झाडं आणि मधोमध मातीची एक टेकडी... पहिल्या नजरेत साधं वाटणारं हे ठिकाण प्रत्यक्षात हजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून आहे. इथे उभं राहिलं की असं वाटतं, जणू काळाची चाकं उलटी फिरायला लागली आहेत आणि आपण थेट हजारो वर्षं मागे, बुद्धांच्या काळात पोहोचलो आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com