Billu Makad election story

Billu Makad election story

esakal

Billu Makad election story : बिल्लू माकडाची राजकीय खेळी: दोन बोक्यांच्या वादातून निवडणूक प्रचार

Modern vs Traditional ideologies in politics : दोन बोक्यांच्या भांडणात माकडाचा लाभ! आधुनिकता विरुद्ध परंपरा या वादातून निवडणूक आणि 'लोणी मनी'च्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेला एक उपरोधिक प्रवास. आजच्या राजकीय वास्तवावर प्राण्यांच्या माध्यमातून ओढलेले जळजळीत ताशेरे.
Published on

सारिका चाटुफळे-कुलकर्णी

एका गावात सगळे सुखाने राहात असत. या वाक्यावरून हे लक्षातच येते की ही आजच्या काळातील गोष्ट नसावी. आजच्या काळात कुठल्याच गावात कोणीच फार सुखी नसते. त्या गावात एके दिवशी एक ‘माऊडा’ नावाचा बोका जमातीतील नागरिक राजाकडे काहीतरी मागणी करण्यासाठी निघाला होता. राजा म्हणजे त्याला दैवत वाटत असे. राजाकडे गेल्याने आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील असा त्याचा पक्का समज होता. परंपरेने चालत आलेल्या सगळ्या गोष्टी त्याला बरोबर वाटत असत. आपल्या देशात पूर्वापार काळापासून जे काही चालत आलेले आहे ते खूपच उदात्त आहे, यावर माऊडाचा ठाम विश्वास होता. माऊडा रस्त्याने मजेमजेत चाललेला असताना त्याला ‘किट्टू’ नावाचा मित्र बोका भेटला.

किट्टूने माऊडाला कुठे चालला आहेस, ते विचारले. आपण आपल्या अडचणी राजाला सांगण्यासाठी आणि राजाश्रय मिळवण्यासाठी चाललेलो आहोत, असे माऊडाने त्याला सांगितले. हे ऐकून किट्टू चिडला. तो माऊडाला म्हणाला, ‘‘तू अडाणी ते अडाणीच राहणार. अरे हे राजे लोक आपल्याला काहीही देत नसतात. उलट आपल्याकडूनच पैसे घेऊन ते स्वतःचे राज्य चालवतात. संस्कार, परंपरा वगैरे सगळ्या कालबाह्य गोष्टी आहेत. आपणच आपले राजे आहोत. आपणच सत्ता आपल्या हातात घ्यायला हवी.’’

Billu Makad election story
Premium|Nelson Mandela Support : ठाण्यातील आदिवासींच्या वर्णद्वेषविरोधी लढ्याला 'मंडेलां'चे बळ; सिद्धपीठातील संघर्षाचा आफ्रिकेतील लढ्याशी धागा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com