

Nelson Mandela Support
esakal
भारतातल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या दहा हजार सभासद संख्या असलेल्या संघटनेने नेल्सन मंडेला यांच्या लढ्याला पाठिंबा देणं, यातून जागतिक स्तरावर काहीच विशेष प्रभाव पडणार नव्हता; पण या निमित्ताने इथल्या आदिवासींमध्ये त्यांच्यासोबत होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात लढण्याचं बळ मिळणार होतं.
भारतातल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या दहा हजार सभासद संख्या असलेल्या संघटनेने नेल्सन मंडेला यांच्या लढ्याला पाठिंबा देणं, यातून जागतिक स्तरावर काहीच विशेष प्रभाव पडणार नव्हता; पण या निमित्ताने इथल्या आदिवासींमध्ये त्यांच्यासोबत होणाऱ्या वर्णद्वेषाविरोधात लढण्याचं बळ मिळणार होतं.
मुक्तानंदबाबांची पुण्यतिथी हा सिद्धपीठातील एक मोठा कार्यक्रम असे. त्याला अनेक अनुयायी जमत. सिद्धपीठातील कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आम्ही जाहीर केलं, की यावेळेस पुण्यतिथीच्या कार्यक्रमावेळी आम्ही ‘रास्ता रोको’ करणार. मुक्तानंदबाबांच्या समाधीकडे मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना आम्ही रोखणार. हे कळल्यावर खूप गदारोळ झाला. ठाण्याच्या पोलिस अधीक्षकांनी खास पोलिस इन्स्पेक्टर पाठवून मला गाडीत घालून पोलिस मुख्यालयात आणलं. तेव्हा खंडेराव शिंदे हे ठाण्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यांनी आधी मला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही त्यांना निग्रहाने म्हटलं, ‘‘तुम्ही आम्हाला कायदा पाळायला का सांगता? आम्ही सिद्धपीठातील कामगारांसाठी किमान वेतन मागतोय. आम्ही तर कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी करतोय. जे कायदा पायदळी तुडवतात, त्यांना तुम्ही कायदा पाळायला सांगा.’’ त्यावर खंडेराव शिंदे थोडे चिडलेच. ‘‘हे बघा, मी शेतकरी संघटनेचा दहा-दहा हजारांचा जमाव कंट्रोल केलेला आहे. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, मी शेतकरी संघटनेवर गोळीबारही केलेला आहे. तेव्हा तुम्हाला कंट्रोल करणं मला अवघड नाहीय.’’ या धमकीवजा इशाऱ्यावर मीसुद्धा संतापलो आणि त्यांना उघड उघड आव्हान दिलं, की ‘‘चला, तुम्ही दहा हजारांचा जमाव कंट्रोल केलेला आहे; तर संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवरून दाखवा.’’ कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणाऱ्या आम्हाला धमकावलं होतं. याचा आम्हाला संताप आला आणि या प्रवृत्तीला जागीच रोखायचं, धडा शिकवायचा ही जिद्दच आम्ही घेतली. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहून मुक्तानंदबाबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३७ (१) (३) प्रमाणे जमावबंदी आदेश जारी केला. पोलिसांनी हा आदेश जारी केल्यानंतर आम्हीही शांतपणे बसून पुढील रणनीतीचा सारासार विचार केला. आम्ही सिद्धपीठाकडे जाणारे रस्ते, गणेशपुरी पोलिस ठाण्याची आणि विरार पोलिस ठाण्याची हद्द यांची पाहणी केली. त्या वेळी आमच्या लक्षात आलं, की गणेशपुरी आणि विरार अशा दोन्ही पोलिस ठाण्यांच्या मध्ये तानसा नदी आहे. तानसा नदीच्या पलीकडे गणेशपुरी आहे आणि अलीकडे वसई आहे. जमावबंदी ही गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हणजे तानसा नदीपलीकडे आहे. विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाही. याचाच फायदा घ्यायचा आम्ही ठरवलं.