
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
आपलं ज्या माध्यमावर प्रेम आहे, त्याच माध्यमाच्या अस्तास आपण कारणीभूत आहोत का, ही ‘द फ्रँचाइज’मधून ध्वनित होणारी सातत्यपूर्ण चिंता ‘द स्टुडिओ’मध्येही केंद्रस्थानी येते. ही चिंता इतकी वैश्विक आहे, की भारतात व इतरत्रही चित्रपटनिर्मितीत काम करणाऱ्या लोकांना तिच्याशी नातं सांगता येतं.