

Biography of Maharani Tarabai of Maratha Empire
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात महाराणी ताराराणी यांच्या पराक्रमाचा अध्याय विलक्षण प्रेरणादायी आहे. त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणादायी यशोगाथा मेधा देशमुख भास्करन यांनी ‘क्वीन ऑफ तारा - काली ऑफ द डेक्कन’ या इंग्रजी पुस्तकात उलगडून सांगितली आहे.
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या व शिवाजी महाराजांची सून असलेल्या ताराबाई लढवय्य्या वृत्तीच्या होत्या. लहानपणापासून तारा आणि तिच्या भावांना छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील पराक्रमाच्या गोष्टी वडिलांकडून ऐकायला मिळत. प्रत्यक्ष युद्धाचे प्रसंगही ते रंगवून सांगत. त्यांनी ताराला मुलांप्रमाणेच घोडेस्वारी, तलवारबाजी असे युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. ताराही या मर्दानी खेळात रमत असे. राजाराम महाराजांची पत्नी म्हणून भोसले घराण्यात त्यांचे आगमन झाले, तेव्हा त्यांचे वय अवघे दहा वर्षांचे होते.