
कीर्तिदा फडके, keertida@gmail.com
सध्या कोणत्याही भाजीबाजारात पाऊल ठेवलं की लक्ष वेधून घेतायत त्या शेंगभाज्या. हिरव्या कोवळ्या दाण्यांचा हा बहर चुकवू नये असाच! वर्षभर मिळणारी सुकी कडधान्यं हा प्रथिनांचा उत्तम स्रोत. पण आपल्याकडे होणाऱ्या उसळी-मिसळीच्या पलीकडेही कडधान्यांचे बरेच पदार्थ आहेत. वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींमधले हे चवदार प्रकार प्रत्येक खव्वय्यानं चाखायलाच हवेत.