- डॉ. धनराज खानोरकर, khanorkardhanraj17@gmail.com
झाडीबोली हे पूर्व विदर्भाच्या दैनंदिन जीवन व्यवहाराचे एक स्वाभाविक साधन आहे. झाडापेडांच्या जवळ राहणाऱ्या साध्या, कष्टकरी लोकांची ही जुनी परंपरा असलेली बोली आजही जिवंत आहे, त्याचे कारण म्हणजे त्यातील यशस्वी साहित्य व कलानिर्मिती...
कोणतीही बोली आपल्या एका भौगोलिक निश्चित क्षेत्रात पसरलेली असते. ती त्या विभागाचे प्रतिनिधित्व करते. बोली साधी, परिणामकारक, जिवंत आणि प्रवाही असते. ती एका विशिष्ट लोकसमूहातील व्यक्तींच्या अंगवळणी पडलेली दिसून येते. बोली शिकावी लागत नाही. ती सहज, स्वाभाविक, पण मोहक होऊन समूहातील व्यक्तींच्या मनोवृत्तीचा व संस्कारांचा भाग होऊन जाते.