Theatre in Education : नाटक म्हणजे केवळ करमणूक नाही; शिक्षणातून माणूस घडवणारी प्रभावी कला

Performance and Learning : नाटकाकडे केवळ करमणूक किंवा अभ्यासेतर उपक्रम म्हणून न पाहता, माणूस, समाज, इतिहास आणि राजकारण समजून घेण्यासाठीचे प्रभावी माध्यम म्हणून शिक्षणात त्याचे महत्त्व अधोरेखित होते.
Performance and Learning

Performance and Learning

esakal

Updated on

आशुतोष पोतदार- potdar.ashutosh@gmail.com

नाटक हे एका मोठ्या विश्वकुटुंबातलं ‘परफॉर्मन्स’चं एक रूप मानलं जातं. नृत्य, विधी, खेळ, उत्सव, राजकीय निदर्शनं, रोजच्या जगण्यातले सोहळे, सोशल मीडियावरचं वावरणंही ‘परफॉर्मन्स’ या व्यापक चौकटीत अभ्यासलं जाऊ शकतं. इथे सर्जनशील निर्मिती, इतिहास, मानवशास्त्र, तत्त्वज्ञान आणि कला एकत्र गुंफले जातात.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं. वर्गांतली गजबज, नव्या विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि एक नवी ऊर्जा पुन्हा जाणवतेय आणि परत तोच प्रश्न. शिक्षण म्हणजे फक्त पदवी, गुण आणि नोकरीची संधी इतकंच का? की माणूस म्हणून अधिक संवेदनशील, चिकित्सक आणि चौकस बनवणारं शिक्षण महत्त्वाचं? आपल्याकडे नाटकाकडे बहुतेक वेळा फक्त ‘एक्स्ट्रा-करिक्युलर’ किंवा स्नेहसंमेलनातील करमणुकीचा प्रकार म्हणूनच पाहिलं जातं. पण नाटक एवढ्यापुरतं नसतं. माणूस, समाज, इतिहास आणि राजकारण यांचा शोध घेणारा तो एक दणकट विषय आहे.

Performance and Learning
Marathi Theatre Festival : नाट्यमहोत्सव: सामूहिक जगण्याचा उत्सव आणि मराठी रंगभूमीला लाभलेली ऐतिहासिक नवसंजीवनी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com