esakal | परदेशात शिक्षण घ्यायचंय? हे आहेत फायदे (व्हि़डीओ)
sakal

बोलून बातमी शोधा

These are benefits of education in foreign country

भारतामध्ये आयआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा असते आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास आणि धडपड करावी लागते. त्या तुलनेत परदेशातील, विशेषत: अमेरिकेतील उत्तम विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविणे सोपे असते. कसे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून... 

परदेशात शिक्षण घ्यायचंय? हे आहेत फायदे (व्हि़डीओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परदेशात शिक्षण घेण्याकडे आता भारतीय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीमध्ये जाण्याचा कल वाढला आहे. भारतामध्ये आयआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा असते आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास आणि धडपड करावी लागते. 

त्या तुलनेत परदेशातील, विशेषत: अमेरिकेतील उत्तम विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविणे सोपे असते.

अमेरिकेमध्ये पदवी शिक्षण घेण्याचे फायदे बरेच आहेत. 

  • भारतात सुरवातीपासूनच शाखेची निवड करावी लागते. उदाहरणार्थ; मेकॅनिकल, संगणक शास्त्र, अर्थशास्त्र वगैरे. अमेरिकेत मात्र विद्यार्थ्यांना पहिली दोन वर्षे त्यांच्या आवडीचे अनेक विषय शिकता येतात आणि त्यानंतर कोणत्या विषयात 'स्पेशलायझेशन' करायचे, ते ठरवता येते. त्याचप्रमाणे, काही वेळा वेगवेगळ्या विषयांमध्ये एकत्रित पदवीही घेता येते. उदाहरणार्थ; अभियांत्रिकी करणारा मुलगा अर्थशास्त्राचे विषयही शिकू शकतो. 
  • भारतामध्ये परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना जास्त महत्त्व दिले जाते. पण अमेरिकेत गुणांपेक्षा त्या विषयाचे सखोल ज्ञान देण्याव्वर जास्त भर दिला जातो. सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीमुळे सतत परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे स्वयंअध्ययन करावे लागते. 

परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे : 

  • येथील विद्यापीठातील अभ्यासक्रम अद्ययावत असतात आणि काळानुरूप त्यात लगेच बदल केले जातात. 
  • या विद्यापीठांमधील प्राध्यापकांचा उच्च दर्जाचे असून त्यांच्याकडे अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू असते. त्यात विद्यार्थीही भाग घेतात. 
  • विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत मिळत असल्याने तेथील शिक्षण हे अतिशय कमी खर्चात पूर्ण होऊ शकते.

     
loading image