

New Marathi Book Releases 2025
esakal
पहिलवान बबन काशिद यांचे ‘लपेट लाल मातीची’ हे संदीप लांडगे यांनी शब्दांकित केलेले आत्मकथन प्रकाशित झाले आहे. मात्र, ही केवळ आत्मकथा किंवा आठवणींचा पट नाही, तर कुस्तीजगताचे केलेले लक्षणीय चित्रण आहे. पहिलवानांची जीवनपद्धती, त्यांचे राहणीमान, तालमीतले जग, सराव, आहार, आर्थिक उलाढाल अशा अनेक घटकांची माहिती या निमित्ताने सामान्य वाचकाला मिळते. काशिद यांचा संघर्ष आणि मल्लविद्या नव्या पिढीमध्ये रुजावी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, उभारलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
वैशिष्ट्य : कुस्तीविश्वातील विविध संदर्भांची माहिती व छायाचित्रे.
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : १७६ मूल्य : २०० रु.