

New Marathi Book Reviews
esakal
प्रा णिशास्त्रज्ञ आणि प्राणी वर्तनशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण आफ्रिकेतील सिंहांच्या उद्यानात काम करणाऱ्या तरुण मनुष्यप्राण्याची ही अनोखी कहाणी. लहानपणापासून छोट्या-मोठ्या प्राणी-पक्ष्यांना पाळून, त्यांचं संगोपन करून बारकाईने निरीक्षण करण्याची त्याची सवय त्याला सिंहाच्या मनातले भाव वाचायला मदत करते. सिंहाला स्वतःहून खाऊ घालण्यापासून बछड्यांना स्वहस्ते बाटलीतून दूध पाजण्यापर्यंतची असंख्य कामे तो सहजपणे करतो. सामान्य माणसांसाठी घातक ठरू शकणाऱ्या त्या जंगलाच्या राजावरही प्रेमाचा वर्षाव करणारा अशक्य असा हा मनुष्य प्राणी म्हणजेच केव्हिन रिचर्डसन! त्याची ही आत्मकथा अवंती महाजन यांनी मराठीत अनुवादित केली आहे. ती वाचताना जाणवणारी रोमहर्षकता अनुभवण्याजोगी आहे.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
पृष्ठे : २७८ मूल्य : ५५० रु.