New Marathi Book : यौवनावस्थेतील बदलांची शास्त्रशुद्ध माहिती देणारं 'निसर्गाचे गोड गुपित... यौवनस्पर्श'

Adolescence Guide in Marathi : वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या शारीरिक आणि भावनिक बदलांना शास्त्रशुद्ध आणि सोप्या भाषेत उलगडणारे 'यौवनस्पर्श' हे पुस्तक किशोरवयीन मुले आणि पालकांसाठी उत्तम मार्गदर्शक आहे.
Adolescence Guide in Marathi

Adolescence Guide in Marathi

esakal

Updated on

मयूर भावे - mayur.bhave@esakal.com

वयात येताना शरीरात होणारे बदल आणि त्याचे मनावर उमटणारे पडसाद याबाबत योग्य वेळी सविस्तर व अचूक मार्गदर्शन होणं आवश्‍यक असतं. या काळातील मुला-मुलींना स्वतःतील बदलाबद्दल जाणून घ्यायचं असतं. त्यांचे काही प्रश्‍न किंवा समस्याही असतात. मात्र, कधी लाज वाटल्याने किंवा कधी भीतीमुळे त्यांच्या शंका अनुत्तरितच राहतात. बऱ्याचदा पालकांनाही नीट माहिती नसते किंवा त्यांना ती योग्य शब्दांत मांडता येत नाही... या सर्व समस्यांची उत्तरे ‘निसर्गाचे गोड गुपित... यौवनस्पर्श’ या पुस्तकात सापडू शकतात.

डॉ. मोहन शं. सुखटणकर, डॉ. अनुराधा रा. देशमुख आणि डॉ. हेमवती मो. सुखटणकर यांनी ह्या पुस्तकाचे मुले आणि मुलींसाठी अशा दोन स्वतंत्र भागात लेखन केले आहे. किशोरवयांतून प्रौढत्वाकडे जाणाऱ्या मुला-मुलींना आपल्या शरीरात होणारे बदल आणि भावना-संवेदनशीलता याबाबत माहीत असणे आवश्यकच आहे. यौवनावस्था म्हणजे काय आणि ती कशी असते? तसेच, ती अनुभवायची इच्छा म्हणजे काय? इत्यादी प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत, तक्ते व आकृत्यांसह देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com