

Allegorical story of fox and lion by Shyam Manohar
esakal
श्याम मनोहर
भू कंप, ज्वालामुखी, कडक उन्हाळा, कडक थंडी, धुवांधार पाऊस, वादळं, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ... खून, आत्महत्या, अपघात, घातपात, दगा, दंगे, माथेफिरूपणा, युद्ध... हाव, दुष्टपणा, भ्रष्टाचार, स्वार्थ, माज, हलकटपणा, घोटाळे, लबाडी... इतके!इतके!! जन्मदर मृत्युदरापेक्षा जास्त आहे.
पृथ्वीवर व्यक्ती आहेत. पृथ्वीवरच्या व्यक्ती संपत नाहीयेत. उरताहेत. खूप उरताहेत. कमी संपताहेत. पृथ्वीवर व्यक्ती उरल्यात, उरताहेत.
आनंद? हर्ष? आश्चर्य? विचित्रपणा? निश्चित भावना ठरत नाही. निसर्गाचा नियम काय आहे?
मेंदू, जागा राहा. मेंदू, शोध. मेंदू, शोध लाव.
संस्कृती म्हणाली, ‘‘भले! भले!’