
Together Movie
Sakal
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘टुगेदर’ आपल्या रूपकाला फक्त कथानकाच्या पातळीवरच नाही, तर दृश्यशैली आणि रचनेच्या सूक्ष्म साधनांतूनही जिवंत करतो. प्रेक्षकाला तो अनुभव सतत जाणवतो. एकीकडे आकर्षण आणि जवळीक तर दुसरीकडे घुसमट आणि तुटकपणा. हाच विरोधाभास चित्रपटाच्या सौंदर्याचं आणि विचारमूल्याचं केंद्र आहे.