Marathi Book : मिठाच्या इतिहासाची अनोखी सफर: 'चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी'

salt in cooking : मीठाचे प्राचीन इतिहास, उत्पादन, विविध प्रकार, सामाजिक-आर्थिक महत्त्व व स्वाद, त्यावर आधारित नियम, कर, कामगारांचे जीवन आणि साहित्यिक संदर्भ या सर्वांचा सखोल अभ्यास ‘चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी’ या पुस्तकात आहे.
salt in cooking

salt in cooking

sakal

Updated on

संपदा सोवनी

मीठ हा रोजच्या जेवणातील एक अत्यावश्‍यक, पण तितकाच खिसगणतीत न राहणारा, असा विरोधाभासी पदार्थ! स्वयंपाकात जास्त न लागणारा, पण नसला तर स्वयंपाकच होऊ शकणार नाही असा एक खूप महत्त्वाचा पदार्थ. अत्यंत स्वस्त अशा या मिठाची स्वतःची काही गोष्ट असेल असा विचारही आपल्या मनात येत नाही. मात्र, मिठाची स्वतंत्र गोष्ट आहे ही केवळ जाणीव करून देणारे नव्हे, तर तिचे सर्वसामान्यांना अजिबात माहिती नसलेले अनेक पैलू उलगडून दाखवणारे पुस्तक म्हणजे, ‘चिमूटभर मिठाची पसाभर कहाणी’! लेखिका आशा उगांवकर यांनी प्राचीन काळापासून आताच्या आधुनिक काळापर्यंतचा पट डोळ्यांसमोर ठेवून मिठाशी संबंधित विविध विषयांचे केलेले हे माहिती-संकलन आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com