
अरविंद रेणापूरकर
सर्वसामान्यांचे आयुष्य गतिमान करण्यात दुचाकी वाहनांचा सिंहाचा वाटा आहे. सकाळी सकाळी दुधाचे कॅन घेऊन येणारा दूधवाला असो की आपत्कालीन स्थितीत रुग्णाला रुग्णालयात दाखल करायचे असो, दुचाकीने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. पाऊस-पाणी असो किंवा भरउन्हातही चालकाला इच्छितस्थळी नेण्यासाठी दुचाकी वाहन सदैव तत्पर राहिले आहे. ‘किक’च्या जमान्यापासून बटणस्टार्टच्या युगापर्यंतचा प्रवास करणाऱ्या दुचाकीला ‘ई-श्रेणी’ने बूस्ट मिळाला आहे. पूर्वी गरज म्हणून पाहिले जाणारे दुचाकी वाहन आज हौसेखातरदेखील खरेदी केले जाताना दिसून येत आहे.