
अश्विनी देव-editor@esakal.com
उमा नावाच्या एका छोट्या मुलीची ही गोष्ट. क्षिप्रा शहाणे यांनी या पुस्तकात सांगताना अनेक विषयांना स्पर्श केलाय. क्षिप्रा शहाणे यांचे हे शंभरावे पुस्तक आहे. बाल वाङ् मयाच्या क्षेत्रात अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. आताच्या मुलांना परी, राक्षस, जादूचा दिवा अशा गोष्टी सांगून चालत नाही. त्यातली गंमत आता त्यांच्या लक्षात येत नाही.