relasakal
सप्तरंग
‘रेला’चा निसर्ग स्वर...
आजचे वैज्ञानिक सांगतात, की एकाच रक्तात संबंध (Inbreeding) झाले तर जनुकं प्रदूषित होऊन पुढची पिढी व्यंग असलेली किंवा निकस निर्माण होऊ शकते.
आदिवासींची ओळख त्यांच्या देवे या समूहावरून कशी व्हायची ते मागच्या भागात आपण पाहिलं. प्राचीन काळात अगदी आर्यांमध्ये सुद्धा सगोत्र विवाह व्हायचे, ग्रीकांमध्ये शुद्ध राजवंशाचं रक्त राखण्यासाठी सख्ख्या बहीण-भावाची लग्न लावली जायची. त्याच्या कित्येक वर्षांपूर्वी आदिवासींनी एकाच रक्तात नव्हे तर कुटुंबातही जैविक संबंध येऊ नये म्हणून ही व्यवस्था निर्माण केली होती.