

Union Budget India
esakal
प्रियदर्शन, saptrang@esakal.com
स्व तंत्र भारताचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करणारे अर्थमंत्री शण्मुगम चेट्टी यांना, आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडल्यानंतरच राजीनामा द्यावा लागला होता. असे सांगितले जाते, की त्यांच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीची किंमत त्या वेळी त्यांना मोजावी लागली आणि नेहरूंनी त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. तसेच शण्मुगम चेट्टी हे ब्रिटिश राजवटीबाबतही अतिशय उदार होते आणि खासगी भांडवलाबाबतही. असे म्हटले जाते, की ‘मिश्र अर्थव्यवस्था’ हा शब्दप्रयोग त्यांनीच प्रथम आपल्या अर्थसंकल्पात वापरला होता.