- गिरिजा दुधाट, dayadconsultancies@gmail.com
सर्वांत घातक शस्त्र कोणतं? सर्वाधिक शत्रू मारतं ते? शत्रूला सर्वांत क्रूर पद्धतीने मारतं ते? नाही! जे शत्रूसोबतच ते शस्त्र चालवणाऱ्यालाही इजा पोहोचवू शकतं ते! भारतीय शस्त्रजगतातल्या काही शस्त्रांचं स्वरूप, वापर प्रतिपक्षासोबतच वापरकर्त्यांसाठीही घातक आणि असुरक्षित होता.
या शस्त्रांचा वापर स्वतःला इजा होऊ न देता शत्रूला नामोहरम करण्याच्या शस्त्रकलेवरील प्रभुत्वावर अवलंबून असायचा. याच काही घातक शस्त्रांपैकी एक म्हणजे ‘उरूमी’. दक्षिण भारतातल्या शस्त्रांमधला कलगी तुरा!