

US Shutdown
sakal
मोहितकुमार डागा- saptrang@esakal.com
जगातील अनेक देश आणि मोठा लोकसमूह या महिन्याच्या एक तारखेच्या मध्यरात्रीपासून अमेरिकेकडे कुतूहलाने पाहत आहे, कारण जगातील सर्वांत सामर्थ्यशाली देशाचे राष्ट्रीय (फेडरल) सरकार ‘गव्हर्नमेंट शटडाउन’मुळे जवळजवळ ठप्प झाले आहे. अमेरिकेतील सुमारे २३ लाख गैरलष्करी फेडरल कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ३२ टक्के कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, तसेच अंदाजे सात लाख कर्मचारी बिनपगारी काम करत आहेत.