Premium|US-Iran Conflict Impact 2026 : अमेरिका-इराण संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेला तडाखा; इंधनाचे दर आणि पुरवठा साखळी धोक्यात

Global Supply Chain Disruption Risks : अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, राजकीय स्वार्थ आणि इंधनाच्या वाढत्या किमतींच्या दबावाखाली दोन्ही देश युद्धबंदीच्या उंबरठ्यावर असले तरी जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट अद्याप कायम आहे, असे चित्र दिसत आहे.
US-Iran Conflict Impact 2026

US-Iran Conflict Impact 2026

esakal

Updated on

हर्ष काबरा - saptrang@esakal.com

अमेरिका-इराण तणावाने जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे. राजकीय अहंकार आणि धोरणात्मक अगतिकता यांच्या खेळात जागतिक पुरवठा साखळीचे तीन-तेरा वाजले असून, आखातातील हा गोंधळ किती लांबतोय यावर जगभरातील अर्थव्यवस्थांचे भविष्य अवलंबून असेल...

अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदी म्हणजे अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या हृदयस्पंदनांच्या वर-खाली जाणाऱ्या आलेखासारखी आहे. खरेतर, युद्धाची ही टांगती तलवार डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स या दोघांच्याही पथ्यावर पडणारी आहे. मायदेशात लयाला गेलेली लोकप्रियता आणि जनतेचा वाढता रोष यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी, युद्ध या दोघांसाठी सुरक्षा कवच आहे.  मात्र, दोन्ही देशांना युद्ध पुन्हा सुरू करण्यात रस असल्याचेही दिसत नाही. अनेक आठवड्यांच्या बॉम्बफेकीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. तरीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण असल्याने जागतिक नौकावहन आणि ऊर्जा बाजारावर आपली पकड मजबूत असल्याचे तेहरानला वाटते. दुसरीकडे, ट्रम्प यांना  इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत राजकीय दबावाचा सामना करावा लागत आहे. इराणची संभाव्य अण्वस्त्रनिर्मितीसाठीची युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता, क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि प्रादेशिक प्रभाव लष्करी हल्ल्यांनंतरही मोडीत काढता आलेला नाही, ही नामुष्कीही  ट्रम्प यांच्यावर ओढवली आहे. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com