

Bharat: The Epitome of Brotherly Love and Sacrifice
Sakal
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
‘वाल्मिकी रामायण’ असं म्हणताच मर्यादापुरुषोत्तम रामचंद्रांची तेजस्वी मूर्ती जशी डोळ्यासमोर उभी राहते, तसाच पाठोपाठ सावलीसारखा सतत सोबत करणारा लक्ष्मणही आठवतोच आणि मग अनेक व्यक्तिरेखा आणि प्रसंग. असाच प्रसंग भरतभेटीचा; पण या प्रत्यक्ष प्रसंगाबरोबरच राम आणि भरतातील प्रेम आधीपासूनच जाणवतं. मग तो राम-लक्ष्मणातील संवाद असो, वा भरताने कैकेयीची केलेली निंदा असो, राम आणि भरत यांच्यातील प्रेमाचा अतूट धागा, विश्वास ठळकपणे जाणवतो.