

Vasudevanand Saraswati
esakal
केदार भारद्वाज - saptarang@esakal.com
श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचे अवतार आहेत. ज्ञान आणि भक्ती या दोघांचाही लोकोत्तर समन्वय महाराजांच्या ठिकाणी झालेला आहे. महाराजांनी तीन वेळा ‘आसेतुहिमाचल’ पायी भ्रमण करून ‘श्रीगुरूदत्तयोग’ प्रस्थापित केला.
श्रीस्वामिमहाराजांचे उपास्य दैवत श्रीदत्तप्रभू असून, त्यांच्याच आज्ञेने महाराजांनी संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये ग्रंथ निर्माण केले. लोकमंगल, लोकवर्धक अशा महाराजांच्या समग्र वाङ्मयाची महती थोर असून, वाचकांना तसे अनुभव आले आहेत. भगवान वेदव्यास आणि जगद्गुरू शंकराचार्य यांच्याच भाष्यपरंपरेसम असलेले पाच हजार पाचशे पृष्ठांचे हे संपूर्ण वाङ्मय १२ खंडांमधून (प्रथम ते द्वादश पुष्पम्) प्रसिद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांचे शिष्य योगीराज गुळवणी महाराज यांनी ब्रह्मश्री दत्तमहाराज कवीश्वरांच्या सहकार्याने केले. ते आता जिज्ञासूंसाठी श्रीवासुदेव निवास, पुणे येथे उपलब्ध आहे.