संघर्ष...मुक्तीचा अन् नव्या वाटचालीचा

आज सोळा डिसेंबर. उत्तुंग विजयाचा दिवस. या विजयाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. हा बांगलादेशासाठी अतिशय विशेष असा दिवस आहे.
sheikh hasina wajed
sheikh hasina wajedsakal

- शेख हसिना वाजेद पंतप्रधान, बांगलादेश

बांगलादेश (Bangladesh) मुक्तिसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष संदेश. (Special Message) या युद्धाची (War) पार्श्वभूमी, बांगलादेशवर तेव्हा ओढवलेली वेळ, संघर्ष (Disturbance) आणि पुढच्या काळात या देशाने केलेली प्रगती (Development) यांच्याबाबतचे विवेचन.

आज सोळा डिसेंबर. उत्तुंग विजयाचा दिवस. या विजयाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. हा बांगलादेशासाठी अतिशय विशेष असा दिवस आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रेहमान यांनी फुंकलेल्या रणशिंगाला प्रतिसाद देऊन, सुमारे २३ वर्षांचा तीव्र राजकीय संघर्ष आणि नऊ महिन्यांचा युद्धाचा रक्तरंजित संघर्ष यांच्यानंतर बांगलादेशने उत्तुंग विजय मिळवला.

मी या विजयाच्या सुवर्णमहोत्सवाबद्दल बांगलादेशी जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते. मी बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. चार राष्ट्रीय नेते, तीस लाख हुतात्मा, दोन लाख विधवा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या भूमिपुत्रांना श्रद्धांजली वाहते. या मुक्तिसंग्रामाला ज्या परदेशांनी आणि मित्रांनी पाठबळ दिले, त्यांचेही मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा सुवर्णमहोत्सव आणि वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांची जन्मशताब्दी यांच्या निमित्ताने ‘मुजिब वर्ष’ पाळले जात असून, त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

संघर्षाचा इतिहास

बांगलावासीयांनी शेख मुजिबूर रेहमान यांच्या धैर्यशाली नेतृत्वात इसवीसन १९४८-५२ या काळात भाषिक चळवळ, सन १९६२मधली शैक्षणिक चळवळ, १९६६मधल्या सहा-कलमी मागण्या आणि सन १९६९मधली अकरा-कलमी चळवळ आणि सामूहिक बंड यांच्याद्वारे स्वतंत्रतेकडे वाटचाल सुरू केली. सन १९७०मध्ये अवामी लीगने तत्कालीन संपूर्ण पाकिस्तानात संपूर्ण बहुमत मिळवले. मात्र, पाकिस्तानींनी बांगलांना सत्ता घेऊ दिली नाही. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय दडपशाही, छळ आणि नाडवणूक संपणार नाही, हे बांगलादेशच्या राष्ट्रपित्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, ७ मार्च १९७१ रोजी रेस कोर्स मैदानावर लाखोंच्या समोर झालेल्या सभेत त्यांनी ठामपणे जाहीर केले, की ‘या वेळचा संघर्ष हा अधिकार न मिळण्याच्या स्थितीतून मुक्तीचा संघर्ष आहे, या वेळचा संघर्ष हा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आहे.’

सशस्त्र लढा

रेहमान यांच्या आवाहनानंतर देशव्यापी असहकार आंदोलन सुरू झाले. सशस्त्र लढ्यासाठीही तयारी सुरू झाली. २५ मार्च १९७१च्या काळरात्री पाकिस्तानी सैन्याने निर्घृण हल्ला केला आणि निरपराध आणि निःशस्त्र बांगलावासीयांचे शिरकाण केले. ता. २६ मार्चच्या पहाटे शेख मुजिबूर रेहमान यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. स्वतंत्रतेसाठीचे थेट युद्ध सुरू झाले. ता. १७ एप्रिलला बांगलादेश प्रजासत्ताकाच्या पहिल्या सरकारची स्थापना झाली. ऐतिहासिक मुजिबनगरमध्ये शेख मुजिबूर रेहमान यांचा अध्यक्षपदी, सय्यद नझरूल इस्लाम यांचा उपाध्यक्षपदी, तर ताजुद्दिन अहमद यांचा पंतप्रधानपदी शपथविधी झाला आणि मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. शूर स्वातंत्र्ययोद्ध्यांनी ता. १६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याचा आणि रझाकार, अल्-बद्र आणि अल्-शाम या त्यांच्या स्थानिक साथीदारांचा पराभव करून विजय मिळवला. आपल्याला आपला लाल-हिरवा ध्वज मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com