

Vinod Khanna
sakal
दिलीप ठाकूर- glam.thakurdilip@gmail.com
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात काही सिनेमावाले आचार्य भक्तीत रममाण झाले. काहींनी आपली कारकीर्द सांभाळत ही भक्ती कायम ठेवली. विनोद खन्नाने चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, आघाडीच्या दिग्दर्शकांचा लाडका, इतकेच नव्हे तर अमिताभ बच्चनचा चांगला स्पर्धक अशी वैशिष्ट्ये असलेला रांगडा नायक स्वतःच बाजूला होतोय, हे सगळ्यांसाठी धक्कादायक होते.