रविवारची मस्त सकाळ... सुट्टीचा माहोल. न्याहरीचा आस्वाद घेतल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी होईपर्यंतचा काळ...
मुंबईतील शिवाजी पार्कसारख्या एका नावाजलेल्या आणि क्रिकेटचे माहेरघर असलेल्या परिसरात असलेल्या एका पॉश इमारतीतील चाळीशी पार केलेले आयटी तसेच कॉर्पोरेटमध्ये साधारणतः महिना लाखभर रुपयांचे पॅकेज असलेले हे क्रिकेटप्रेमी... (हे ‘युवक’ बऱ्यापैकी वरच्या स्तरावरील म्हणजेच क्लब क्रिकेट खेळलेले; पण नोकरीचा मार्ग निवडल्यामुळे आता क्रिकेट खेळणे केवळ हौशेपुरतेच.) टीव्हीवर भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू असल्याने पुन्हा क्रिकेट खेळण्याची आलेली उर्मी. त्यामुळे गप्पा अर्थातच क्रिकेटवर; पण या वेळी मात्र जरा व्यापक विचार...