कितीही गोळ्या खा, हृदय रोगांना इलाज नाही

190716095529_1_900x600.jpg
190716095529_1_900x600.jpg
Updated on

पुणे : शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघावीत, हृदय स्वस्थ राहावे आणि आरोग्य निरोगी राहावे म्हणून बरेच लोक व्हिटॅमिनच्या, प्रोटीनच्या, मिनरल्सच्या गोळ्या घेतात आणि डायट पण करतात. परंतु, अशा कितीही गोळ्या घेतल्या आणि डायट केले तरीही स्वस्थ शरीर आणि हृदयाचे आरोग्य जास्त काळापर्यंत चांगले राहू शकत नाही असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील 'जॉन्स हॉपकिंग' या प्रसिद्ध औषधनिर्माण संस्थेने केलेल्या पाहणीतून हे सिद्ध झाले आहे. त्यांनी अमेरिकेतील 277 औषध दुकाने आणि 24 वेगवेगळ्या प्रकारातील लोकांवर हे संशोधन केले आहे. या संबंधीचा शोधनिबंध नुकताच 'ऍनल्स ऑफ इंटरनल मेडिसीन' या औषधशास्त्राच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे. 

बरेचसे लोक फक्त भीतीपोटीच डायट आणि गोळ्या घेतात त्याचा कोणत्याही आजाराशी संबंध नसल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. या मध्ये प्रमुख्याने कमी मिठाचे अन्न, ओमेगा-3 फॅटी ऍसिड सप्लीमेंट, फॉलिक ऍसिड सप्लीमेंट, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन 'डी.'च्या गोळ्या लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. लोकांच्या या वर्तनाकडे बघून ज्येष्ठ संशोधक ऍरिन डी. मीकॉस म्हणाले,"डायटसाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी लोक ज्या जादुई गोळीचा शोध घेत आहे ती कधीच मिळणार नाही. की जी गोळी घेतल्यानंतर आरोग्य आपोआप स्वस्थ राहील.'' 

हृदयाचे विकार, हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅकसाठी तसेच डायटसाठी जगभरात प्रमुख्याने 16 व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि 8 सप्लीमेंट घेतल्या जातात असे अहवालातून सिद्ध झाले आहे. जगभरातील 9 लाख 92 हजार लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला.

अभ्यासातून समोर आलेली तत्थे
-'ब्लड प्रेशर'साठी कमी मिठाचे खाणाऱ्या साडे तीन हजार लोकांपैकी 79 लोक दगावली. यातून फक्त 10 टक्के मरण्याचा धोका कमी होतो. 
- उच्च रक्तदानासाठी (हाय ब्लड प्रेशर) नियमित गोळ्या घेणाऱ्यांपैकी तीन हजार 600 लोकांपैकी 674 लोक अभ्यासा दरम्यान दगावले आहे. 
-  संपूर्ण संशोधनातून गोळ्यांमुळे आणि डायटमुळे फक्त 8 टक्‍क्‍याने धोका कमी होतो असे सिद्ध झाले आहे. 

या संशोधनाबद्दल बोलताना वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठातील औषधशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि या शोधाचे प्रमुख सुफी खान म्हणाले,"आमच्या संशोधनातून सर्वांना एक संदेश मिळत आहे. व्हिटॅमिनच्या गोळ्या, प्रोटीनच्या सप्लीमेंट यामुळे आरोग्य चांगले राखण्यात किंवा मृत्यूपासून दूर जाण्यात थोडी फार सूट मिळत असेल. परंतु कायमस्वरूपी हृदयाच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळत नाही.'' संशोधनासाठी कोणतेही पैसे मिळाले नसल्याने शोधामागे काही व्यापारी उद्देश असल्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असे शोधकर्त्यांनी सांगितले आहे. 

शोध निबंधाचे संकेतस्थळ ः https://www.sciencedaily.com/releases/2019/07/190716095529.htm

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com