
- डॉ. दिलीप देवधर, saptrang@esakal.com
पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि ते शुद्ध असावं म्हणून पिण्यापूर्वी त्यांची आपण शहानिशा करूनच पित असतो. महानगरपालिका पाण्याचं शुद्धीकरण करून आपल्याला पुरवीत असते तरीही काही लोकं ते अधिक शुद्ध करून पित असतात आणि प्रवासाला जाताना किंवा प्रवास करत असताना आपल्याला शुद्ध पाणी मिळेल की नाही या भीतीने अनेक लोकं खनिज पाणी किंवा पाण्याच्या पॅकबंद बाटल्या घेऊन जात असतात.