esakal | साप्ताहिक राशिभविष्य : १६ ते २२ फेब्रुवारी
sakal

बोलून बातमी शोधा

साप्ताहिक राशिभविष्य : १६ ते २२ फेब्रुवारी

पंचांग 16 फेब्रुवारी 2020 

साप्ताहिक राशिभविष्य : १६ ते २२ फेब्रुवारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग 16 फेब्रुवारी 2020 

रविवार ः माघ कृष्ण 8, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 7.05, सूर्यास्त 6.35, चंद्रोदय रात्री 12.47, चंद्रास्त दुपारी 12.30, भारतीय सौर माघ 27, शके 1941. 

महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल 

मेष : मंगळभ्रमणाचा एक टप्पा तरुणांना अतिशय सुंदररीत्या फलदायी होईल. अश्र्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना छानपैकी सूर गवसेल. ता. १८ ते २० हे दिवस विजयी षटकारांचे. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. भरणी नक्षत्रच्या व्यक्तींना सहकुटुंब प्रवासयोग. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील. 
=========== 
नोकरीत बढतीचा योग 

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापतींची काळजी घ्यावी. काहींना भ्रातृचिंता शक्‍य. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना उच्च राशीतील शुक्रभ्रमण या सप्ताहाच्या सुरवातीला मोठ्या धनवर्षावाचं. 
श्रीरामदासनवमी शुभमुहूर्ताची. कौटुंबिक सुवार्ता मिळतील. गुरुवारी नोकरीत बढतीचा योग. 
=========== 
व्यावसायिक मरगळ जाईल 

मिथुन : वक्री बुधाची स्थिती आणि गुरू-शुक्राचं पाठबळ तरुणांना मोठ्या संधी देणारं. व्यावसायिक मरगळ जाईल. ता. १९ व २० हे दिवस पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना विक्रमी फळं देणारे. विशिष्ट सन्मान मिळतील. सप्ताहातील मंगळभ्रमण आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याची शक्यता. काळजी घ्या. 
=========== 
त्वचेची काळजी घ्या 

कर्क : वक्री बुधाचं भ्रमण आणि शनी, मंगळ व हर्षल यांची स्थिती तुम्हाला कोंडीत पकडू शकते. एखादा सरकारी ससेमिरा मागं लागू शकेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ ते २० या कालावधीत अनेक प्रकारे अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. आश्र्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी त्वचेची काळजी घ्यावी. 
=========== 
प्रत्येक वन डे जिंकाल! 

सिंह : होतकरू तरुणांना हा सप्ताह पर्वणीसारखा. प्रत्येक वन डे जिंकाल. ता. १९ ची विजया एकादशी विजयोत्सव साजरा करणारी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचं पूर्वसंचित फळाला येईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. 
=========== 
प्रवासात काळजी घ्या 

कन्या : राशीच्या चतुर्थातील मंगळभ्रमण काहीतरी दुखवत-खुपवत ठेवेल. नादुरुस्त वाहनं चालवू नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. १८ व १९ या दिवशी प्रवासात काळजी घ्यावी. बाकी, हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमणाचं पॅकेज जबरदस्त क्‍लिक होईल. 
पतीचा वा पत्नीचा मोठा भाग्योदय. 
=========== 
संकटाचं निवारण होईल 

तूळ : हा सप्ताह चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा. प्रेमप्रकरण सांभाळा. नका लावून घेऊ वेड! बाकी, कलाकारांना, खेळाडूंना मोठं ग्लॅमर प्राप्त होईल. काहींचं अनपेक्षित परदेशगमन. स्वाती नक्षत्राच्या आणि विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार गुरुकृपेचा. संकटविमोचन होईल. 
=========== 
कुसंगती कधीही न घडो! 

वृश्‍चिक : या सप्ताहातील ग्रहमान शुभ ग्रहांच्या लॉबीतूनच बोलणारं. अर्थातच श्रद्धावंत, तसंच प्रामाणिक मंडळींनाच त्याची अनुभूती येईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट बाजी मारतील. मात्र, कुसंगती सदैव टाळा. स्त्रीचं मांगल्य जपा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार धनयोगाचा. 
=========== 
परदेशगमनाची संधी 

धनू : मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळाचं उपद्रवमूल्य राहील. दुष्ट, व्यावहारिक मंडळींशी संपर्क नकोच. राजकीय व्यक्तींपासून अंतरच राखा. बाकी, शुक्रभ्रमणाच्या कला आणि राशीचं गुरुभ्रमण बुद्धिजीवी मंडळींना मोठ्या संधी प्राप्त करून देणारं. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतून परदेशगमनाच्या संधी. वास्तुयोग. 
=========== 
वागणं-बोलणं चोख ठेवा

मकर : या सप्ताहात तुम्ही ग्रहांच्या सीसी कॅमेऱ्याखाली राहणार आहात. वागणं-बोलणं-चालणं अतिशय चोख आणि स्वच्छ ठेवा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह ग्रहांच्या कडक फील्डिंगचा. मंगळवार विचित्र लक्षणांचा. बाकी, श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना महाशिवरात्र शुभदायी. 
=========== 
कामं मार्गी लागतील 

कुंभ : राशीतील वक्री बुधाची स्थिती व्याधिजन्य पार्श्‍वभूमीवर खराब. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य ज्वरपीडा. प्रकृतीची काळजी घ्या. बाकी, या सप्ताहात गुरू-शुक्राची स्थिती उत्तमच राहील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विजया एकादशी मोठ्या सुवार्तांची. अवघड कामं मार्गी लागतील. 
=========== 
महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील 

मीन : राशीचं शुक्रभ्रमण गुरुभ्रमणाला उत्तम साथ देईल. ता. १९ व २० हे दिवस अतिशय वेगवान राहतील. महत्त्वाच्या गाठी-भेटी होतील. एखादं कोर्टप्रकरण मार्गी लागेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं ग्लॅमर मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतल्या बदलाची चिंता सतावेल. 
०००===========००० 
 

loading image