esakal | जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope

साप्ताहिक राशिभविष्य १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२०
नकारात्मक विचार टाळाच 
मेष :
अश्‍विनी नक्षत्रास बुध-शनी केंद्रयोग सप्ताहात उगाचंच नैराश्‍य आणणारा. नकारात्मक विचार टाळाच. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना ५ नोव्हेंबर २०२० चा गुरुवार गाठीभेटींतून फलदायी होणारा. तरुणांना कला वा छंद माध्यमातून प्रकाशात आणणारा. ता. ७ चा शनिवार सूर्योदयी बेरंगाचा. अश्‍विनी नक्षत्रास गुप्तचिंता.

जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

साप्ताहिक राशिभविष्य १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२०

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नकारात्मक विचार टाळाच 
मेष :
अश्‍विनी नक्षत्रास बुध-शनी केंद्रयोग सप्ताहात उगाचंच नैराश्‍य आणणारा. नकारात्मक विचार टाळाच. बाकी स्वतंत्र व्यावसायिकांना ५ नोव्हेंबर २०२० चा गुरुवार गाठीभेटींतून फलदायी होणारा. तरुणांना कला वा छंद माध्यमातून प्रकाशात आणणारा. ता. ७ चा शनिवार सूर्योदयी बेरंगाचा. अश्‍विनी नक्षत्रास गुप्तचिंता. 

नोकरीत प्रसन्नता राहील 
वृषभ :
रोहिणी नक्षत्रास सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. कर्ज प्रकरणातून त्रासाचा. बाकी तरुणांना नोकरीत प्रसन्न ठेवणारा. कृत्तिका नक्षत्रास बुध-शनी केंद्रयोगातून सप्ताहाची सुरुवात कायदेशीर कटकटींची. भावंडांशी गैरसमज. शुक्रवारची संध्याकाळ मृग नक्षत्रास शुभ ग्रहांच्या स्पंदनाची. गॉडफादर भेटेल.

वरिष्ठांवर प्रभाव टाकाल
मिथुन :
आर्द्रा नक्षत्रास गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ ग्रहांचे दिवस मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचे. तरुणांना नोकरीचे कॉल येतील. नोकरीत वरिष्ठांवर प्रभाव टाकाल. पुनर्वसू नक्षत्रास ता. ६ चा शुक्रवार आत्यंतिक प्रवाही राहील.  महत्त्वाची कामे. मृग नक्षत्रास शनिवार हरवाहरवीचा. बालहट्टातून त्रास. 

व्यावसायिक प्रदर्शनं यशस्वी
कर्क :
सप्ताहाची सुरुवात पुनर्वसू नक्षत्रास घरातील प्रिय व्यक्तीची चिंता लावेल. गर्भवतींनी सांभाळावे. पुष्य नक्षत्रास सप्ताह शुक्रभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिक प्रदर्शनं यशस्वी करणारा. आश्‍लेषा नक्षत्रास शनिवार सरकारी कायदे नियमांमुळे त्रासाचा. सकाळच्या सत्रामध्ये वावरताना कुत्री जपा. 

व्यावसायिक वसुली होईल
सिंह :
सप्ताह जनसंपर्कातून गैरसमजाचा. मघा नक्षत्रव्यक्तींनी सांभाळावे. सप्ताह यंत्र, वाहनं इत्यादींतून त्रासाचा. बाकी ता. ५ व ता. ६ नोव्हेंबर २०२० हे दिवस शुभ ग्रहांच्या स्पंदनांचे. व्यावसायिक वसुली. पूर्वा नक्षत्रास नोकरीत भाग्योदयाचा. उत्तरा नक्षत्रास शनिवार एकूणच बेरंगाचा. 

तरुणांना चांगला कालखंड 
कन्या :
राशीच्या शुक्रभ्रमणाचे एक पॅकेज अस्तित्वात येईल. ता. ४ ते ६ नोव्हेंबर २०२० हे दिवस तरुणांना नोकरीत छानच. नोकरीत सुरक्षित वाटू लागेल. हस्त नक्षत्रास तरतरी येईल. चित्रा नक्षत्रास ता. ६ चा शुक्रवार जीवनातील प्युअर सीक्वेन्स लावेल. शनिवारी खरेदी करताना सावधान. उत्तरा नक्षत्राची फसवणूक होऊ शकते. 

सावधपणे निर्णय घ्या
तुळ :
राशीच्या बुधाची विशिष्ट स्थिती गोंधळात टाकणारी. चित्रा व्यक्तींनी महत्त्वाचे निर्णय घेताना सावधान! घरातील तरुणांची मानसिकता सांभाळावी. स्वाती नक्षत्रास ता. ४ ते ता. ६ हे दिवस व्यावसायिक प्राप्ती वाढवतील. विशाखा नक्षत्रास शुक्रवार मोठा शुभलक्षणी. मात्र शनिवार संसर्गजन्य. 

जुन्या गुंतवणुकीतून लाभ
वृश्‍चिक :
सप्ताहावर शुभ ग्रहांचा वरचष्मा राहीलच. मात्र सार्वजनिक जीवनातून क्रिया-प्रतिक्रिया जपाच. संशयास्पद वागू-बोलू नका. बाकी सप्ताहाची सुरुवात अनुराधा व्यक्तींना व्यावसायिक तेजीची. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. ज्येष्ठा शुक्रवारी "खुल जा सिमसिम.'' शनिवारी स्नायूपीडा. 

अंतिम सामना जिंकणार 
धनु :
सप्ताहात साडेसातीचा विसर पडेल. पूर्वाषाढा नक्षत्रव्यक्ती जीवनातील विशिष्ट फायनल जिंकणार आहेत. तरुणांनो, सप्ताहात दबा धरून बसाच! मूळ नक्षत्रव्यक्तींनी जुगारसदृश टाळावे. बाकी नोकरीतील एखादं यश अप्रेझलमध्ये मानांकन मिळवेल. शनिवारी सर्व प्रकारची पथ्यं पाळा. दुरुत्तरे टाळाच. 

आचरसंहिता पाळण्याचे दिवस
मकर :
आचारसंहिता पाळण्याचेच आपले दिवस आहेत. उत्तराषाढा नक्षत्रास संसर्गजन्य बाधेतून त्रास होईल. बाकी शुक्रभ्रमणाचा श्रवण नक्षत्रव्यक्ती उत्तम लाभ उठवतील. ता. ३ चे रोहिणी नक्षत्र मोठे शुभसंबंधित राहील. काहींच्या विवाहविषयक गाठीभेटी. व्यावसायिक शुभारंभ. शनिवार स्त्रीशी गैरसमजाचा. 

शुभ ग्रहांची साथ मिळेल 
कुंभ :
सप्ताह फक्त फील्डवर टिकून राहण्याचा! नो शॉर्टकट किंवा नका काढू चोरट्या धावा. सप्ताहात मौनातूनही अनेक गोष्टी साध्य होतील. सप्ताहात तरुणांनी कुसंगत जपावीच. बाकी ता. ४ ते ६ नोव्हेंबर २०२० हे दिवस शुभ ग्रहांच्या साथसंगतीचेच! घरातील तरुणांचे उत्कर्ष. पूर्वाभाद्रपदास कला, छंद माध्यमातून प्रसिद्धी. शततारकास शनिवार जागरणाचा. 

नोकरीत भाग्योदय होईल 
मीन :
शुभ ग्रहांची लॉबी ता. ४ ते ता. ६ या दिवसांत उत्तम क्रियाशील होईल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. रेवती नक्षत्राची कळी फुलेल. वैवाहिक जीवनातून चक्क हास्यविनोद होतील. उत्तराभाद्रपदा व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय. शनिवार खरचटण्याचा. काहींना दंतव्यथा. महत्त्वाचे दस्तऐवज जपा.

Edited By - Prashant Patil