जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य : 22 ते 28 मार्च

bhavishya
bhavishya

डंख शनी-मंगळाचा! 
‘शनी’ ही मानवी देहातील मन, बुद्धी आणि अहंकार यांच्या मिश्रणातून झालेली प्रक्रिया होय आणि ‘मंगळ’ ही मानवी जीवनातील या प्रक्रियेतून उसळून बाहेर येणारी प्रतिक्रिया होय! त्यामुळेच मंगळ हा शनीच्या राशीत उच्च होत असतो. आज हा मंगळ शनीच्या राशीत म्हणजेच ‘मकर’ राशीत प्रवेश करत आहे आणि या आगमनातच तो प्लुटोशी युतियोग करत आहे. 

जीवनाचा एक प्रकारचा ग्रह करून घेत जगणारा माणूस आपलं एक प्रतिक्रियारूप जीवन जगत असतो. सध्या तर भारतात माणूस आणि माणसाची प्रतिक्रिया हेच जगण्याचं भांडवल होऊ पाहत आहे!  कुंभ

माणूस आणि माणसाची प्रतिक्रिया खरोखरच अजब म्हणावी लागेल. साप फणा काढतो, घोडा उधळतो, गाढव खिंकाळतं किंवा लाथा झाडतं, वाघ डरकाळ्या फोडतो, बैल शिंग मारतो किंवा श्वान भुंकतं किंवा पिसाळतं...या सर्व प्रतिक्रिया माणूस एकाच वेळी करू शकतो! त्यामुळेच माणूस महान आहे! सध्याच्या कलियुगातील माणूस वरील प्राण्यांच्या प्रतिक्रिया क्षणोक्षणी दाखवत असलेला पाहायला मिळतोय! त्यामुळेच सध्या माणूस हा एक निव्वळ प्रतिक्रियाच होऊन राहिला आहे! 

माणसाच्या पत्रिकेतील शनी आणि मंगळ हे ग्रह क्रिया, प्रक्रिया आणि प्रतिक्रिया यांना विषय पुरवतात आणि जीवनात नाट्ये घडवतात. शनी स्ट्रॅटेजीचं चिंतन करतो आणि मग या स्ट्रॅटेजीचा सर्जिकल स्ट्राईक मंगळ घडवून आणत असतो! 

मित्र हो, आगामी काळात शनीच्या मकर राशीत शनी-मंगळ सहयोग राहील. अशा काळात आपल्या प्रतिक्रिया देताना किंवा चेहऱ्यावर प्रकट करताना अतिशय सावध राहिलं पाहिजे, नाहीतर आपल्या प्रतिक्रियेतून दुसऱ्याच्या पत्रिकेतील मंगळ आपल्यावर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो! हे लक्षात घेऊन आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे आणि आपण आपल्या आजूबाजूचे साप, घोडे, गाढव, वाघ, बैल आणि श्वान यांपासूनही सावध राहिलं पाहिजे. नाहीतर आपल्याला सर्पदंश किंवा श्वानदंशसुद्धा होऊ शकतो! 
=========== 
अवसानघातकी निर्णय नकोत 
मेष :
या सप्ताहात मंगळ राशीच्या दशमस्थानात येऊन शनी-मंगळाचं एक पर्व सुरू होत आहे. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना आगामी आठ- दहा दिवसांच्या काळात विशिष्ट अपवादात्मक स्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्‍यता. अवसानघातकी निर्णय नकोत. सार्वजनिक जीवनात वादविवाद टाळावेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या माध्यमातून अतिशय सुंदर! 
=========== 
सर्वतोपरी काळजी घ्या 
वृषभ :
शुक्राचं राश्‍यंतर शनिवारी विलक्षण भाग्योदयाची चाहूल देणारं. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी लाभ घेण्यासाठी सज्ज राहावं. बाकी, हा सप्ताह अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात मृग नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य बाधेचा. सर्वतोपरी काळजी घ्या. जागरण करावं लागण्याची शक्यता. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार विचित्र मानसिक गोंधळाचा. गुप्त चिंता सतावू शकते. 
=========== 
आततायीपणा करू नका 
मिथुन :
ता. २३ व २४ चं अमावास्येचं प्रभावक्षेत्र विचित्र ग्रहपार्श्‍वभूमीचं. जागरूक राहा. शनी-मंगळाची व्यूहरचना सुरू होत आहे. कोणताही आततायीपणा नको. अपघातासंदर्भात काळजी घ्या. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सर्व प्रकारे आचारसंहिता पाळावी. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मोठ्या दैवी प्रचीतीचा. पुत्रोत्कर्ष. विवाहयोग. 
=========== 
परिस्थितीचं भान ठेवा 
कर्क :
या सप्ताहात मंगळाचं सप्तम स्थानात आगमन होत आहे. शनी-मंगळाची व्यूहरचना युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकते. नैसर्गिक घटना-परिस्थितीमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी भान ठेवून वागावं. ता. २६ व २७ हे दिवस कुयोगांच्या उच्च दाबाचे. विद्युत्‌-उपकरणांपासून काळजी घ्यावी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार शुभ. सुवार्ता मिळेल. 
=========== 
‘छप्पर फाड के’ लाभ 
सिंह :
ता. २३ व २४ चं अमावास्येचं प्रभावक्षेत्र मंगळाच्या राश्‍यंतराच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय दखलपात्र. अमावास्या व्याधिग्रस्तांच्या संदर्भातून संवेदनशील. पथ्यं पाळा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाचा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहयोगांतून चमत्काराचा! मघा आणि पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवारी ‘छप्पर फाड के’ लाभ होईल! 
=========== 
निराशा येऊ देऊ नका 
कन्या :
या सप्ताहात मानसिक आरोग्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. ता. २३ व २४ हे अमावास्येचं क्षेत्र वागण्या-बोलण्यांतून बेरंग करणारं. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी नैराश्याचा सामना खंबीरपणे करावा. बाकी, सप्ताहाच्या शेवटी नोकरी-व्यवसायातल्या मंडळींना विशिष्ट संधी मिळतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना धनयोग. उत्तरा नक्षत्राच्या कलाकारांचा भाग्योदय. 
=========== 
नोकरीतील बदली लाभदायक 
तूळ :
विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी गुरू-शुक्र शुभयोगाच्या पॅकेजचा लाभ होईल. मोठे करारमदार होतील. नोकरीत बदलीतून लाभ. मंगळाचं राश्‍यंतर चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात त्रासदायक. स्त्रीवर्गाशी वाद नकोत. शनिवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा. वास्तुयोग. 
=========== 
गैरसमज होऊ देऊ नका 
वृश्र्चिक :
नवसंवत्सरारंभाचा सप्ताह तुमच्या राशीला एकूणच शुभसूचक! अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. गुरू-शुक्राची स्थिती ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक लाभ देणारी. मात्र, मंगळाचं राश्‍यंतर अमावास्येच्या आसपासच्या काळात वादात ओढणारं. गैरसमज होऊ देऊ नका. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्ती रम्य संध्याकाळचा अनुभव घेतील, शुक्राच्या चांदणीचं सौंदर्य अनुभवतील. 
=========== 
वास्तूचे व्यवहार होतील 
धनू :
अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात होणारं मंगळाचं राश्‍यंतर वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर काही लक्षणं दाखवेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या मानसिक गोंधळाची. बाकी, पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्राच्या शुभयोगातून अप्रतिम लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मान-सन्मानाचा. महत्त्वाच्या गाठी-भेटी. वास्तूचे व्यवहार मार्गी लागतील. 
=========== 
अद्वितीय फळं मिळतील 
मकर :
आज तुमच्या राशीत मंगळाचं आगमन होत आहे. या सप्ताहात तुमच्या बाबतीत एक वेगळी घटना अस्तित्वात येणार आहे. श्रद्धेनं आणि सचोटीनं वागणाऱ्या मंडळींना हा सप्ताह अद्वितीय फळं देईल. काहींचं पूर्वसंचित गुरू-शुक्राच्या स्थितीनं फलद्रूप होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अप्रतिम. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार बॅड डे! जनसंपर्क टाळलेलाच चांगला. 
=========== 
आचारसंहिता पाळाच! 
कुंभ :
मंगळाचं राश्‍यंतर होऊन ग्रहांची एक नवी रचना अस्तित्वात येत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना ही रचना कडक आचारसंहिता पाळायला लावणार आहे. ता. २३ व २४ हे अमावास्येचं प्रभावक्षेत्र शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना काहीशा अस्वस्थतेचं. काळजी घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरू-शुक्र शुभयोग. शनिवारी प्रसन्नतेचं वातावरण राहील. 
=========== 
व्यवसायात मोठे लाभ 
मीन :
सप्ताहातील गुरू-शुक्राची स्थिती अतिशय शुभ राहील. अमावास्येचं प्रभावक्षेत्र सोडल्यास सप्ताह खास फळं देईल. राशीतील अमावास्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य. सर्वतोपरी काळजी घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींचा भाग्योदय. व्यवसायात मोठे लाभ होतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com