esakal | राशिभविष्य (ता. ३१ जानेवारी २०२१ ते ०६ फेब्रुवारी २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope

शनीचं झुकतं माप कुणाला?
स्त्रीच्या जीवनातील पुरुष आणि पुरुषाच्या जीवनातील स्त्री ही गोष्ट किंवा बाब माणसाच्या जीवनात अविभाज्य घटक असल्यासारखीच आहे. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांच्या जीवनात वेगवेगळ्या भूमिकांतून हरक्षणी अवतरतच असतात!

राशिभविष्य (ता. ३१ जानेवारी २०२१ ते ०६ फेब्रुवारी २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

शनीचं झुकतं माप कुणाला?
स्त्रीच्या जीवनातील पुरुष आणि पुरुषाच्या जीवनातील स्त्री ही गोष्ट किंवा बाब माणसाच्या जीवनात अविभाज्य घटक असल्यासारखीच आहे. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांच्या जीवनात वेगवेगळ्या भूमिकांतून हरक्षणी अवतरतच असतात! उदाहरणार्थ : माता-पिता, बंधू-भगिनी, मित्र-मैत्रिणी, पती-पत्नी, नोकरचाकर, शेजारी-शेजारणी, मालक-मजूर आणि अगदी कथापुराणातल्या गुरू किंवा शिष्या या संबंधातूनही!

आपली पृथ्वी ही शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या मध्ये आहे; किंबहुना शुक्र (स्त्री) आणि मंगळ (पुरुष) या स्त्री-पुरुषसंबंधातील भावबंधातून पृथ्वीचं मन (चंद्र) सतत हेलकावेच खात असतं असंच म्हणा ना! कधी प्रेमाश्रू ढाळणारं हे पृथ्वीचं मन स्वप्न बघत कौतुकानं मुरकतंसुद्धा! किंवा कधी कुणाच्या आठवणीनं जीवनगाणं गात ‘आ जा शाम होने आई’ म्हणत घराबाहेरपण पडतं!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक माणसामध्ये एक स्त्री दडलेली असते, तसंच प्रत्येक माणसामध्ये एक पुरुष दडलेला असतो. मनुष्य हे एक मांगल्य आहे. स्त्रीनं पुरुषाचं मांगल्य जपलं पाहिजे, तसंच पुरुषानं स्त्रीचं पावित्र्य अर्थातच मांगल्य जपलं पाहिजे. माणसातील स्त्रीत्व आणि पुरुषत्व ज्या वेळी शुद्ध होतात त्या वेळीच माणसाच्या जीवनात प्रसन्नता नांदते आणि मगच माणसाचं जीवनगाणं एक भक्तिसंगीत होऊन त्याचा भावसुगंध आजूबाजूला दरवळत राहतो! मित्र हो, या सप्ताहात शनी-शुक्र युतीयोग होत आहे. 
स्त्री-पुरुषतत्त्वाचं मांगल्य जपणाऱ्या माणसाकडे शनीसुद्धा श्रद्धेनं पाहतो. म्हणूनच तो तूळ राशीत उच्च होतो आणि अशा श्रद्धावंतांना तो झुकतं माप देतो!

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कायदेशीर प्रश्‍न सुटतील
मेष :
शुक्र-शनी सहयोगाचं फील्ड भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजीतून फलदायी होईल. ता. दोन ते चार हे दिवस मोठे प्रवाही. काहींचे कायदेशीर प्रश्‍न सुटतील. बाकी, राजकीय व्यक्तींना ता. चारची कालाष्टमी क्रिया-प्रतिक्रियांतून वादळी ठरू शकते. सावध! अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल.

ओळखीतून लाभ
वृषभ :
या सप्ताहातील विशेष लाभसंपन्न रास राहील. शुक्र-शनीच्या पॅकेजचा पूर्ण लाभ घ्याल. ओळखी-मध्यस्थींतून लाभ. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकींतून लाभ. ता. एक व दोन हे दिवस सुवार्तांचे. मात्र, वाहनं सांभाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत वरिष्ठांशी जपून वागावं.

सुवार्ता मिळतील
मिथुन :
सप्ताहातील वक्री बुधाची स्थिती आणि रवी-मंगळाचा योग विशिष्ट शारीरिक वेदनांमुळे अस्वस्थ करू शकतो. भाजण्या-कापण्याच्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्या. बाकी, आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र-शनी योगाच्या पॅकेजमुळे वास्तुविषयक व्यवहारातून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी सुवार्ता मिळतील. 

वास्तूची खरेदी 
कर्क :
शुक्र-शनी योगाचं पॅकेज पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवर प्रभाव गाजवेल. व्यावसायिक व्यवहार लाभदायक होतील. वास्तूची खरेदी मार्गी लागेल. ता. दोन व तीन हे दिवस अत्यंत प्रवाही. शनिवार महत्त्वाच्या गाठी-भेटींचा. इच्छुकांचे विवाह ठरतील.

लव्हस्टोरी फुलेल!
सिंह :
ता. चार रोजी येणाऱ्या कालाष्टमीच्या आसपासच्या काळात रवी-मंगळ योगातून उच्च दाब राहील. शॉर्टसर्किटपासून जपून... डोक्‍याच्याही! बाकी, पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस व्यावसायिक लाभांचे. मंत्रालयातून कामं मार्गी लागतील! उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची परिचयोत्तर लव्हस्टोरी फुलेल!

महत्त्वाची कामं होतील
कन्या :
शुक्र-शनी योगाचं पॅकेज हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना जबरदस्त क्‍लिक होईल. व्यावसायिक प्रदर्शनांतून, तसंच राजकीय व्यक्तींकडून लाभ होतील. ता. दोन व तीन हे दिवस अतिशय प्रवाही. महत्त्वाच्या कामांत हात घालाच. ता. चार रोजी येणारी कालाष्टमी प्रवासात बेरंग करणारी. चोरी-फसवणुकीची शक्यता. काळजी घ्या.

परदेशगमनाची संधी
तूळ :
मोठं मजेदार ग्रहमान आहे. शुक्र-शनी सहयोगातून काही लाभ होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. सप्ताहाचा शेवट नावीन्यपूर्ण राहील. मात्र, सप्ताहाच्या सुरुवातीला रवी-मंगळ योगातून उच्च दाब राहील. शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या. बाकी, चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. परदेशी जाण्याचा योग.

जुन्या गुंतवणुकींतून लाभ
वृश्र्चिक :
शुक्र-शनी योगाच्या पॅकेजचा मोठाच प्रभाव या सप्ताहावर राहील. वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ होतील. या सप्ताहात कामगारप्रश्‍न जपून हाताळा. सप्ताहाचा शेवट पुत्रोत्कर्षाचा. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय.

उच्चशिक्षणात प्रगती
धनू :
या सप्ताहात मूळ नक्षत्राच्या व्यक्ती विशेष प्रकाशझोतात राहतील. उच्चशिक्षणात प्रगती होईल. कॅम्पसमधून नोकरी. ता. दोन व तीन हे दिवस विशिष्ट विक्रम प्रस्थापित करणारे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना कौटुंबिक सुवार्ता मिळतील.  धन्यता अनुभवाल. शनिवार सहकुटुंब मौज-मजेचा.

उच्च दाबाचा सप्ताह
मकर :
हा सप्ताह रवी-मंगळ योगाच्या पार्श्वभूमीवर थोडासा उच्च दाबाचा! सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासात काळजी घ्या. बाकी, शुक्र-शनी योगाचं पॅकेज श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना अनुदान देईल! ता. दोन व तीन हे दिवस अतिशय शुभलक्षणी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट धनवर्षावाचा!

व्यावसायिक येणं येईल
कुंभ :
शुक्र-शनी योगाचं एक प्रकारचं गुप्त सहकार्य राहील. वादग्रस्त व्यावसायिक येणं येईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार गाठी-भेटींतून फलदायी. तरुणांच्या नोकरीच्या अंतिम मुलाखती यशस्वी होतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार जल्लोषाचा. स्पर्धात्मक यश मिळेल.

उलाढाल वाढेल
मीन :
हा सप्ताह व्यावसायिकांचा उत्साह वाढवणारा. शुक्र-शनी योगाचं पॅकेज व्यवसायातील पतप्रतिष्ठा वाढवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाच व सहा हे दिवस मोठ्या व्यावसायिक उलाढालींचे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी कामगारप्रश्‍न जपून हाताळावेत.

Edited By - Prashant Patil