esakal | साप्ताहिक राशिभविष्य (ता. ७ मार्च २०२१ ते १३ मार्च २०२१)

बोलून बातमी शोधा

weekly horoscope}

जीवीच्या जिव्हाळ्याचं स्वरानुसंधान !
माणूस हा एक जिव्हाळा आहे आणि या माणूस नावाच्या भूमीमध्ये भूमिका घेऊन जगणारा माणसाचा जिव्हाळा एक प्रकारचा ओलावा पकडून जगत असतो ! आणखी असंही म्हणा, की हा माणसाच्या अंतर्मनाचा जिव्हाळा खोल-खोल हृदयामध्ये जीव धरून असतो. त्यालाच जीवीचा जिव्हाळा म्हणतात.

साप्ताहिक राशिभविष्य (ता. ७ मार्च २०२१ ते १३ मार्च २०२१)
sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

जीवीच्या जिव्हाळ्याचं स्वरानुसंधान !
माणूस हा एक जिव्हाळा आहे आणि या माणूस नावाच्या भूमीमध्ये भूमिका घेऊन जगणारा माणसाचा जिव्हाळा एक प्रकारचा ओलावा पकडून जगत असतो ! आणखी असंही म्हणा, की हा माणसाच्या अंतर्मनाचा जिव्हाळा खोल-खोल हृदयामध्ये जीव धरून असतो. त्यालाच जीवीचा जिव्हाळा म्हणतात. फलज्योतिषात नेपच्यून या ग्रहाचा याच जीवीच्या जिव्हाळ्याशी संबंध येतो आणि तोच तो जपत असतो.

सप्ताहात महाशिवरात्रीच्या प्रदोषाच्या प्रहरात रवी-नेपच्यून युतीयोग होत आहे. रवी हा तारा आहे; तो ग्रह नाही. सूर्याकडून तेज घेऊन पृथ्वी तिच्या अंतरंगात जिव्हाळा जपत त्याला प्रदक्षिणा घालत असते. अशा या अंतरंगातील आत्मतेजाला जिव्हाळा देणारा तोच नेपच्यून होय! असा हा ‘ये हृदयींचे ते हृदयी’ घालून हृदयं जेवणारा ‘जीवीच्या जिव्हाळ्याचा लवलवणारा कोंभ’ विश्‍वाचं एका अर्थी वात्सल्यच जपत असतो! माणसाच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आता आली आहे. या अर्थाचा अर्याथाशी संबंध येत नसून तो जीवीच्या जिव्हाळ्याशीच येतो. असा हा मानवी जीवनग्रंथाचा पानोपानींचा जिव्हाळा भगवतगीता सांगून गेली!

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

‘तैसे अध्यात्मशास्त्री इये। अंतरंगचि अधिकारिये।’ असेच ज्ञानदेव म्हणतात. आदिशक्तीच्या कर्णकुलरी नांदणाऱ्या जीवीच्या जिव्हाळ्याचा हुंकार म्हणजेच ॐ नमः शिवाय! तर मित्रहो ज्योतिषाचा स्वर हा पंचमहाभूतात्मक शक्तींच्या गाभाऱ्यातील जिवाच्या जिव्हाळ्याचा हुंकार ऐकणारे शिवस्वरोदयच होय ! जीवीच्या हुंकाराचा स्वर पकडणारे ज्योतिष हे शिवालिखितच आहे ! यंदाच्या ता. अकराला म्हणजे गुरुवारी येत असलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्व जण आपल्या हृदयाकाशात जीवीच्या जिव्हाळ्याचे स्वरानुसंधान साधून ‘ॐ नमः शिवाय!’ मंत्र म्हणत जिव्हाळ्याने अभिषेक करूया !

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रगतीची नवी दालनं उघडतील
मेष :
सप्ताहात बुद्धिजीवी मंडळींना मोठे सुंदर ग्रहमान राहील. प्रगतीची नवी दालनं उघडतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमोत्तम कल्पना सुचतील. त्यांच्या कार्यवाहीला गुरुभ्रमण साथ देईल. महाशिवरात्रीचा गुरुवार कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींसाठी महत्त्वाचा. अमावास्या परदेशस्य तरुणांना शुभ!

कलाकारांचा भाग्योदय
वृषभ :
दशमस्य रवी-शुक्र-नेपच्यून सहयोग कलाकारांचे भाग्योदय करणारा. ता. नऊची विजया एकादशी विजयोत्सव साजरा करणारी. काहींना व्यावसायिक उत्सवप्रदर्शनांतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे सप्ताह ग्रासलेलं नैराश्‍य घालवेल. अमावास्येजवळ रोहिणी व्यक्तींनी व्हायरस जपावा.

विशिष्ट संशोधनात यश लाभेल
मिथुन :
रवी-नेपच्यून-शुक्र यांचा सहयोग आपली कल्पनाशक्तीची झेप वाढवेल. विशिष्ट संशोधनात यश मिळेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती महाशिवरात्रीच्या या सप्ताहात परमेश्‍वराशी संवाद साधतील. विशिष्ट पुत्रोत्कर्ष धक्का देईल. सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती सेलिब्रिटी होतील. मात्र व्हायरस जपा. शॉर्टसर्किटपासून सावध.

विजया एकादशी सुवार्ता देणारी
कर्क :
सप्ताहावर गुरू आणि शनी या ग्रहांचं अधिराज्य राहीलच. सप्ताहात कोणतंही उसनं अवसान नको. जुगार टाळा. कुसंगत टाळा. अमावास्येजवळ सहवासातील स्त्रीशी जपूनच. बाकी आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. नऊ व दहा हे दिवस सरकारी कामांतून शुभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. नऊची विजया एकादशी सूर्योदयी सुवार्तेची. अमावास्या प्रवासात त्रासदायक.

व्यावसायिक पेचातून सुटका होईल
सिंह :
रवी-शुक्र-नेपच्यून सहयोग सप्ताहाच्या सुरुवातीस पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक उपक्रमांतून यशच देईल. कलाकारांचा भाग्योदय. उत्तरा नक्षत्राच्या तरुणांना महाशिवरात्रीची पर्वणी मोठी भाग्यसूचक. अमावास्या नोकरी-व्यावसायिक अनपेक्षित भाग्योदयाची. व्यावसायिक पेचप्रसंगातून सुटका.

तरुणांना विविध क्षेत्रांत सुसंधी
कन्या :
सप्ताहात बदसल्ल्यापासून सावध राहा. अर्थातच सत्संग ठेवा. ता. नऊ व दहा हे दिवस शुभ ग्रहांच्या अखत्यारीतले. तरुणांना शिक्षण, नोकरी वा विवाह या घटकांतून संधी. हस्त आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ९ ची विजया एकादशी भाग्याची बीजं पेरणारीच. शनिवारी सूर्योदयी विद्युत उपकरणापासून काळजी घ्या.

महाशिवरात्र सुवार्ता देणारी
तूळ :
सप्ताहातील मंगळ-राहू यांची विशिष्ट स्थिती वृद्धांना खराब. काहींना नेत्रपीडा. बाकी तरुणांना रवी-नेपच्यून-शुक्र सहयोग सप्ताहारंभी ऑनलाइन क्‍लिक होणारा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धियोग. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात लाभ. महाशिवरात्रीचा दिवस वैयक्तिक सुवार्तांचा. अमावास्या संसर्गाची. अपचन.

काल्पनिक भय सोडा
वृश्‍चिक :
अमावास्येचा सप्ताह घरातील प्रिय व्यक्तींच्या संदर्भातून विचित्र गुप्तचिंतेचा. काल्पनिक भय सोडा. बाकी सप्ताहातील ता. नऊ व दहा हे दिवस ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक यशप्रतिष्ठा देणारे. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. तेराच्या अमावास्येचं प्रभावक्षेत्र असुरक्षित. विद्युत उपकरणांपासून जपा.

तरुणांना नोकरीत पगारवाढ
धनू :
सप्ताहातील मंगळ-राहू यांची स्थिती आणि अमावास्येच्या प्रभावातील नेपच्यूनचा प्रभाव साथीच्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर खराब. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी जपावं. बाकी सप्ताहाची सुरुवात तरुणांना छानच. नोकरीत पगारवाढ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना महाशिवरात्र यशप्रसिद्धीची. अमावास्या हितशत्रूपीडेची.

अपवादात्मक लाभ मिळतील
मकर :
सप्ताहातील ग्रहांची फिल्डिंग आचारसंहिता पाळायला लावेल. अन्नपाण्यातील संसर्ग जपा. प्रिय व्यक्तींशी गैरसमज टाळा. बाकी व्यावसायिकांना हा सप्ताह अपवादात्मक असे लाभ देईल. तरुणांचे नोकरीतील ॲप्रेझेल बढतीकडे नेईल. धनिष्ठा व्यक्तींचे परदेशात भाग्योदय. अमावास्या श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभाची. स्त्रीशी गैरसमज टाळा.

वास्तुविषयक व्यवहार टाळा
कुंभ :
सप्ताह राशीतील होणाऱ्या अपवादात्मक ग्रहमानाचा. कोणत्याही प्रलोभनांपासून सावध. वास्तुविषयक खरेदी-विक्रीचे गैरव्यवहार टाळा. बाकी सप्ताह बुद्धिमान तरुणांना मोठी साथ देणारा. ता. अकरा व बारा हे दिवस मोठे शुभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. मात्र अमावास्येजवळ वेंधळेपणा टाळा.

थोरा- मोठ्यांच्या कृपेतून नोकरी
मीन :
सप्ताहात सार्वजनिक जीवनातून जपा. अमावास्येच्या सप्ताहातील रवी-नेपच्यू आणि मंगळ-राहू यांची पार्श्‍वभूमी विचित्र गाठीभेटी घडवेल. सावध. बाकी सप्ताहातील ता. नऊ ते अकरापर्यंतचे दिवस गुरूच्या मंत्रालयातूनच बोलणारे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक लाभ होतील. थोरामोठ्यांच्या कृपेतून नोकरी लाभेल. अमावास्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीचिंतेचा काळ.

Edited By - Prashant Patil