esakal | जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य
sakal

बोलून बातमी शोधा

weekly horoscope

साप्ताहिक राशिभविष्य 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर

जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे: साप्ताहिक राशिभविष्य 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर

मेष:-या आठवड्यातील ग्रहमान विवाह जुळून येण्यास अनुकूल आहे, तरी इच्छुकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. प्रेम विवाहासाठी मात्र अधिक प्रयत्न करावे लागतील. समोरील गोष्टी डोळसपणे पहायला शिका. प्रलोभनाला भुलून कोणतेही काम करायला जाऊ नका. महिलांनी संयमाने वागावे.
शुभ दिवस:-१८, २४

वृषभ:-शेअर्स, लॉटरी सारख्या व्यवहारात सावधगिरीने काम करा. मोहापासून दूर राहणेच इष्ट ठरेल. कौटुंबिक जीवनात क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. मित्रांशी पारदर्शक संबंध ठेवावेत, अन्यथा गैरसमजाची ठिणगी पडू शकते. जमिनीच्या व्यवहारात सर्व गोष्टी व्यवस्थित तपासून घ्याव्यात.
शुभ दिवस:-१८, २०

मिथुन:-नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी नसती साहसे करायला जाऊ नका, प्रलोभनापासून दूर राहिलात तरच येणारा काळ अधिक सुखकर ठरेल. अनपेक्षित बदलांनी विचलित होऊ नका. कामाच्या ठिकाणी मतभेद व वादविवाद यांपासून दूर राहावे लागेल. महिलांनी मानसिक स्थैर्य जपत जबाबदारी पार पाडावी.
शुभ दिवस:-१९, २२

कर्क:-प्रयत्नात कसून न करणे, वेळेचा अपव्यय टाळणे या गोष्टी केल्यास तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण होऊ शकतील. वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या धोरणात खरे उतरण्याचा प्रयत्न करावा लागेल. महिलांनी कौटुंबिक जबाबदारी ओळखून कामाचे नियोजन आखावे. मुलांच्या काही बाबी आपणास नाराज करू शकतात.
शुभ दिवस:-२१, २४

सिंह:-हातातील अधिकार ओळखून समोरील संधीचा लाभ घेता यायला हवा. त्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले तरी हरकत नाही. मागील काळात आलेले अनुभव गाठीशी बांधून वेळोवेळी सतर्क राहणे फायद्याचे ठरेल. मनातील क्षुल्लक कारणाने आलेली निराशा झटकून टाकून सकारात्मक विचारांना चालना द्यावी.
शुभ दिवस:-१८, २४

कन्या:-कोणतेही साहस करताना या काळात सावधानता बाळगावी लागणार आहे. तुमच्या कर्तुत्वाला काही अंशी वाव मिळाला तरी त्याचा अतिरेक करू नये. भावंडांशी सामंजस्याचे संबंध ठेवावेत. वैवाहिक सौख्यात कटुता येणार नाही काळजी घ्यावी. सर्वांशी आनंदाने व गोडीने वागल्यास चांगला परिणाम समोर येईल.
शुभ दिवस:-१९, २०

तूळ:-या काळात प्रत्येक व्यवहार करताना खूप सावधानता बाळगावी लागणार आहे. सावधपणे वावर हवा, तसेच क्रोधावर नियंत्रण हवे. विचारांमध्ये प्रगल्भता ठेवली तर संघर्षाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. महिलांनी संयमाचे धोरण अवलंबावे. कामाव्यतिरिक्त अन्य कोठेही फार लक्ष घालू नये.
शुभ दिवस:-१८, २२

वृश्चिक:-व्यवसायात वा कामाच्या ठिकाणी महिला वर्गापासून काही अंतर राखून वागावे लागेल. कामात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार यासाठी दक्षता बाळगावी. कलावंत मंडळींना अनुकूलता लाभेल. व्यवसायानिमित्त वारंवार प्रवास करावा लागेल. काही कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस:-२०, २४

धनू:-घरात मंगलकार्याचे वारे वाहू लागतील. प्रवास घडतील व ते सफल देखील होतील. नुकत्याच झालेल्या ग्रहमानातील मोठ्या बदलामुळे आपल्याला घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहावे लागेल. तुमच्या कामाची योग्य प्रकारे दखल घेतली जाईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.
शुभ दिवस:-१८, २१

मकर:-काही निर्णय ठामपणे व आत्मविश्वासाने घ्यावे लागतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणुकीचे निर्णय याच आठवड्यात घ्यावेत. जोडीदाराशी ‘तुझं माझं जमेना व तुझ्यावाचून करमेना’ अशी अवस्था राहील. अति धाडसाने कोणतेही निर्णय घेऊ नका. काही कामे कारण नसताना अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.
शुभ दिवस:-२०, २४

कुंभ:-कौटुंबिक बाबतीत काही प्रसंगात मतभेदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेस प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. बोलताना देखील काही गोष्टींचे भान राखावे लागेल. उगाच काही गोष्टीत नाक खुपसू नये. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने देखील खबरदारी घ्यावी लागेल.
शुभ दिवस:-२२, २४

मीन:-जमीन जुमल्याबाबत केलेली गुंतवणूक कामी येऊन त्यातून चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनात देखील काहीशी कुरबुर राहण्याची शक्यता आहे, काही गोष्टी सामंजस्याने जुळवून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यानी आळसाला थारा देऊ नये. हातातील वेळेचा सदुपयोग करावा.
शुभ दिवस:-२१, २३