esakal | जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य
sakal

बोलून बातमी शोधा

main saptahik rashi bhavishya.jpg

पुणे: साप्ताहिक राशिभविष्य 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर

जाणून घ्या तुमचा पुढचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: साप्ताहिक राशिभविष्य 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर

पंचमहाभूतांशी खेळू नका


मेष : सप्ताहात मंगळ आणि हर्षल यांच्या स्थितीतून नैसर्गिक साथ मिळणार नाही. ता. २९ ते ता. ३१ ऑक्‍टोबर २०२० हे पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रातील दिवस प्रवास वा वाहतुकीतून बेरंग करणारे. पंचमहाभूतांशी खेळू नका. अश्‍विनी नक्षत्र लक्ष्य होऊ शकतं. भरणी नक्षत्रास कोजागरी पौर्णिमा मोठ्या सुवार्तांची. पुत्रोत्कर्ष. धनवर्षाव.

कोजागरी दैवी प्रचितीची


वृषभ : सप्ताह व्यावसायिकांना विशिष्ट करारमदारांतून भवितव्य ठरवेल. कृत्तिका नक्षत्रव्यक्ती एकप्रकारे सीमोल्लंघन करतील. विवाहयोग आहेत. बुध-शुक्राची विशिष्ट स्थिती ऑनलाइन क्‍लिक होणारी. रोहिणी नक्षत्रास शुक्रवारची कोजागरी शुक्रकलांतून दैवी प्रचितीची. ता. २८ ते ता. ३० हे दिवस चढत्या क्रमानं शुभ. मृग नक्षत्राची गुप्तचिंता जाईल.

वास्तुविषयक व्यवहारांना गती


मिथुन : आजची विजयादशमी मोठी शुभलक्षणी. आध्यात्मिक प्रचितीचं सीमोल्लंघन होईल. मृग नक्षत्रास सप्ताहात सतत ग्रीन सिग्नल मिळतील. वास्तुविषयक व्यवहारांना गती मिळेल. आर्द्रा नक्षत्रव्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ओळखी- मध्यस्थीतून लाभ देईल. पुनर्वसू नक्षत्रास ता. २८ व ता. २९ हे दिवस विजयोत्सवाचे.

व्यावसायिक वसुली होईल


कर्क : सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना मोठ्या उभारीचा. विशिष्ट अडकलेली कामं मार्गी लागतील. ता. २८ ते ता. ३० हे दिवस आश्‍लेषा नक्षत्रास मोठा दिलासा देणारे. व्यावसायिक वसुली होईल. पुनर्वसू नक्षत्रास आजची विजयादशमी भाग्यसंकेतांची. पुष्य नक्षत्रास कोजागरी पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कलहजन्य.

आर्थिक ओघ वाढेल


सिंह : पौर्णिमेच्या सप्ताहातील लाभसंपन्नच रास राहील. मघा नक्षत्रास मोठा फास्टट्रॅक राहील. आपणास सप्ताहाची सुरुवात आश्‍वासकच राहील. कलाकारांना पौर्णिमेचं फिल्ड मुक्त वाव देईल. परदेशस्थ तरुणांचं नैराश्‍य जाईल. ता. २७ व ता. २८ हे दिवस उत्तरा नक्षत्रास व्यावसायिक आर्थिक ओघ वाढवतील. पूर्वा नक्षत्रास पौर्णिमा गुरुकृपेची. पुत्रोत्कर्ष.

पौर्णिमा सुवार्ता देणारी


कन्या : वक्री मंगळाचा पौर्णिमेजवळ विचित्र प्रभाव राहील. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी सावधान. बाकी उत्तरा नक्षत्रास शुक्रभ्रमण, ता. २९ ते ता. ३० ऑक्‍टोबर २०२० या दिवसांत भावस्पंदनांतून कनेक्‍टिव्हिटीचे. विवाहेच्छूंनी अँटिने रोखावेत. हस्त नक्षत्रास पौर्णिमा सूर्योदयी सुवार्तेची. व्यावसायिक लाभ.

मौल्यवान वस्तू सांभाळा


तूळ : पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हर्षलच्या ताब्यातलं. कोणतीही थट्टामस्करी नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. बाकी रवी-बुध युतीयोग आणि गुरुभ्रमणाच्या स्पंदनांतून विजयादशमी वैयक्तिक सुवार्तांच्या पार्श्‍वभूमीवर सीमोल्लंघन करेल. स्वाती नक्षत्रास आजचा रविवार अलौकिक. विशाखा नक्षत्रास ता. ३० चा शुक्रवारचा सूर्योदय दिव्य प्रचितीचा.

लाभ होतील, प्रसन्नता राहील


वृश्‍चिक : यंदाच्या कोजागरी पौर्णिमेजवळ ग्रहांची मोठी शक्तिस्पंदनं राहतील. ज्येष्ठा नक्षत्रास गुरुभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे लाभ. ता. २८ व ता. २९ हे दिवस मोठे प्रसन्न राहतील. अनुराधा नक्षत्रास ता. २८ चा बुधवार एक मोठा शुभशकुनाचा दिवस. मात्र, पौर्णिमेजवळ विचित्र हितशत्रुपीडा. गावगुंडांचा त्रास.

प्रचंड फॉर्ममध्ये याल


धनू : यंदाची विजयादशमी तिचं नाव सार्थक करणारी. मूळ नक्षत्रव्यक्ती प्रचंड फॉर्ममध्ये येतील. या सप्ताहाचा लाभ त्यांनी जरूर घ्यावा. नोकरीत मोठ्या संधी येतील. परदेशस्थ तरुणांना नोकरीचा लाभ. पूर्वाषाढा व्यक्तींना ता. २८ चा बुधवार उत्तम घडामोडींचा. शुभ ग्रहांचं मोठं पाठबळ. उत्तराषाढाचं परदेशगमन निश्‍चित होईल.

नोकरीत भाग्योदय


मकर : पौर्णिमेचा सप्ताह हर्षलच्या प्रभावातून बोलणारा. अनपेक्षित घटनांची पार्श्‍वभूमी राहू शकते. काहींच्या बाबतीत नैसर्गिक प्रकोप चिंतेचा ठरू शकतो. बाकी उत्तराषाढा व्यक्तींना रवी-बुध युती आणि शुक्रभ्रमणाची विशिष्ट स्थिती लाभसंपन्न करेल. नोकरीत भाग्योदय. श्रवण नक्षत्रास प्रसिद्धीयोग. मात्र, शनिवार घरात अशांततेचा.

वादविवाद टाळा


कुंभ : पौर्णिमेच्या सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये प्रभाव टाकणारी रास. अनेक गोष्टींत मध्यस्थ राहाल. बुद्धिजीवी मंडळींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र विशिष्ट निमित्तानं फ्लॅशन्यूजमध्ये आणेल. शततारका व्यक्तींनी शनिवारी वाद टाळावेत. पूर्वाभाद्रपदा व्यक्तींचं वैचारिक सीमोल्लंघन.

व्यावसायिक मोठी सुरुवात


मीन : सप्ताहात वक्री मंगळ सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत राहील. रेवती नक्षत्रव्यक्तींनी जपावं. घरात वाद टाळा. बाकी सप्तमस्थ शुक्रभ्रमणाचा पहिला अध्याय उत्तराभाद्रपदा व्यक्तींना ता. २८ ते ता. ३० या दिवसांत मोठा शुभलक्षणी ठरणारा. विशिष्ट प्रसन्न गाठीभेटी. व्यावसायिक मोठे शुभारंभ. शनिवारी रस्त्यावर जपा.

- श्रीराम भट